"माझे कुटुंब माझी ताकद'मधून मांडला खडतर प्रवास!

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 5 जुलै 2016

जळगाव - देवानं मुलांच्या रूपात फळ दिले, त्यांना कसे वाढवायचे...पण वनवास सोसत वाढवले. त्यानं बी स्वतः कष्ट घेतले..त्याचं चीज झालं. आज दारात गाडी आणली अन इथपर्यंत आणलं; असा विष्णू औटी यांचा प्रवास आणि माझ्या आई- वडिलांनी शिकू दिले नाही, पण आपल्या मुलांना शिकवायचे. आपल्यासारखे कष्ट करू देण्याची वेळ येऊ द्यायची नाही, हे स्वप्न पूर्ण झाले; हा अजय खर्डे यांचे बालपण आणि शिक्षणाचा खडतर प्रवास त्यांच्या माता- पित्यांनी आजच्या कार्यक्रमात उलगडला.

"दीपस्तंभ‘ फाउंडेशनतर्फे काल (ता.3) कांताई सभागृहात ग्रेट भेट या उपक्रमांतर्गत "माझे कुटुंब माझी ताकद‘ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात सहाय्यक विक्रीकर आयुक्‍त विष्णू औटी व सहाय्यक पोलिस निरीक्षक अजय खर्डे यांच्या परिवाराची प्रकट मुलाखत घेण्यात आली. सुरवातीला श्री. औटी यांच्यासह वडील हरिभाऊ, आई रंगूबाई, पत्नी सरिता औटी तसेच अजय खर्डे यांचे वडील रूमाल, आई गोताबाई आणि पत्नी मिना खर्डे यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. जालिंदर सुपेकर, विक्रीकर सहआयुक्‍त बी. एन. पाटील, सहा. विक्रीकर आयुक्‍त समाधान महाजन, दीपस्तंभचे यजुर्वेंद्र महाजन उपस्थित होते.

घडविले अन्‌ घडलो
अडाणी आई- बाबांनी शिकू दिले नाही. दोन एकर शेती, यात आपले लेकरं काय पिकवतील अन्‌ काय खातील, शेती पुरणार नाही. हा विचार पण होता. म्हणून शिक्षणाशिवाय पर्याय नाही, हे सांगत मुलांना शिकवायचे ठरविले आणि त्याला घडविले. आपल्यासारखे कष्ट आपल्या लेकराला नको म्हणून त्याला शाळेत पाठवलं अन शिकवलं; असा प्रवास रूमाल आणि गोताबाई खर्डे यांनी उलगडला.

"नाना तुझ्या नावाकरीता‘ने डोळ्यात पाणी
छोट्याशा वस्तीत रहायचो. रोजंदारीवर काम करायचो म्हणून दिवस कसे काढायचे, मुलांना कसे वाढवायचे हा प्रश्‍न होता. वनवास काढत मुलांना वाढविले. त्याला शाळेत नोकरी लागली. तरी तू कशासाठी करतो म्हणून विष्णूला इचारलं. पण "नाना तुझ्या नावाकरीता करतो‘ असं मुलाने सांगितल्याचे हरिभाऊ औटी यांनी सांगितल्यानंतर सभागृहात उपस्थितांच्या डोळ्यात पाणी आले होते.

Web Title: "My family My strenth' My journey!