राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा जिल्हाधिकारी कार्यालयावर 'युवा आक्रोश मोर्चा'

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 28 मार्च 2018

नगर- जिल्हाधिकारी कार्यालयावर राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे 'युवा आक्रोश मोर्चा' काढण्यात आला. सकाळी 11 वाजता छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून निघालेला हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर दुपारी दीड वाजता पोचला यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येत उपस्थित होते. त्यांच्या हातात विविध मागण्यांचे फलक होते.

भाजपाने केंद्र व राज्यात सत्तेवर येण्यापूर्वी राज्यातील जनतेला दोन कोटी युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले होते. परंतु, या दोन कोटी युवकांपैकी १० लाख युवकांना देखील हे भाजपा-सेना  सरकार रोजगार उपलब्ध करू शकले नाही. परिणामी राज्यात तसेच देशात युवकांचे बेरोजगाराचे प्रमाण वाढले आहे. केंद्र व राज्य सरकारने दिलेल्या खोट्या आश्वासने, युवकांची वाढत असलेली बेरोजगारी, विद्यार्थ्याच्या बंद असलेल्या शिष्यवृत्ती, राज्य लोकसेवा आयोगच्या जागा कमी केल्या त्या परत वाढविण्यात याव्या, टीईटी परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्याना तात्काळ नोकरीत सामावून घेण्यात यावेत, महागाई, बिघडलेली कायदा व सुव्यवस्था, आरोग्य व्यवस्था, उद्योग रोजगारात झालेली घसरण अशा विविध मागण्यासाठी निवेदन करण्यात आले. 

या मोर्च्यात आमदार संग्राम जगताप, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते, युवक शहर जिल्हाध्यक्ष अभिजित खोसे, विठ्ठलराव लंघे, अमित खामकर, अॅड. शारदा लगड, युवक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: nagar congress yuva aakrosh morcha BJP shevsena jobs