नगर परिषद वर्ग तीनच्या परीक्षेत कॉपीचे सर्रास प्रकार

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 21 मे 2018

नाशिक - नगर परिषद वर्ग तीनच्या पदासाठीच्या परीक्षेत सर्रास गैरप्रकार घडून येत असल्याची तक्रार परीक्षार्थींनी केली आहे. काही परीक्षार्थी आपल्या परिचयातील अन्य परीक्षार्थींच्या शेजारी बसून परीक्षा देत आहेत, प्रश्‍न सोडविताना एकमेकांशी चर्चा करण्याचीही मुभा मिळत आहे, तर प्रश्‍नपत्रिकेत एकच प्रश्‍न दोन वेळा विचारण्याचाही प्रताप भरती परीक्षेत घडत आहे.

परीक्षेतील सावळ्या गोंधळामुळे परीक्षार्थींकडून संतप्त प्रतिक्रिया व्यक्‍त केली जात आहे.

‘महापरीक्षा’च्या माध्यमातून नगर परिषद वर्ग तीनसाठी १९ ते २१ मेदरम्यान राज्यभरातील विविध केंद्रांवर परीक्षा घेतली जात आहे. या परीक्षेच्या नियोजनात ढिसाळपणा सुरू असल्याचे परीक्षार्थींचे म्हणणे आहे. काही परीक्षार्थी तर थेट परीक्षा केंद्रावर मोबाईल आणले जात असल्याची तक्रारदेखील आहे. सरसकट कॉपीसारखा प्रकार या परीक्षेत होत असल्याचा आरोपसुद्धा होत आहे. वेगवेगळ्या समस्यांना परीक्षार्थी समोरे जात आहेत.

Web Title: nagar parishad class three exam cheat

टॅग्स