Vidhan Sabha 2019 : यादीत नावचं नाही..परत घरी चाललो..

navmatdar.jpg
navmatdar.jpg

नाशिक : जिल्ह्यातील पंधरा विधानसभा मतदार संघात आज (ता.२१) मतदानाला उत्साहात प्रारंभ झाला. 15 मतदार संघात 148 उमेदवार रिंगणात आहेत. जिल्ह्यात १५ मतदार संघात ४५७९ मतदान केंद्रावर सकाळी ७ ते सायंकाळी ६ यावेळेत मतदान होत आहे. मात्र या मतदानात जे मतदार पहिल्यांदा मतदानाचा हक्क बजावत आहेत. अशा काही नवमतदार तरुणांची नावे यादीत नसल्याने तरुणांचा हिरमोड होताना दिसला.

यादीत नावचं नाही..परत घरी चाललो..

पहिल्यांदा मतदान करण्यासाठी आलो होतो. मतदार यादीत शोधाशोध केली..सर्व लिस्ट पाहिल्या.. पण नावच सापडले आले नाही .. असे अंबासन येथे मतदान करणारा नवमतदार निलेश कोर याने 'सकाळ' सोबत बोलताना सांगितले.

शहरात व ग्रामीण भागात मतदारांचा मोठा उत्साह

ढगाळ वातावरण असतानाही शहरात व ग्रामीण भागात मतदारांचा मोठा उत्साह असून अनेक केंद्रांवर सकाळपासूनच मतदानासाठी मतदारांनी गर्दी केली आहे. शहरासह जिल्ह्यात सर्वच मतदार संघात सकाळपासूनच उमेदवारांनी मतदानाचा हक्क बजावत आहेत

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com