जामनेर- येथील हिवरखेड रोडवरील आखाड्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी (ता. १६) ‘नमो कुस्ती महाकुंभ २.०’स्पर्धा पार पडली. यात सोलापूरचा महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख आणि कोल्हापूरची अमृता पुजारी हे देवाभाऊ केसरी किताब आणि मानाच्या चांदीच्या गदेचे मानकरी ठरले. देश-विदेशातील १५० मल्ल स्पर्धेत सहभागी झाले होते.