चाळीसगाव तालुक्‍यात मंडलाधिकाऱ्याला अटक

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 6 मे 2017

मेहुणबारे (ता. चाळीसगाव) - खरेदी केलेल्या जमिनीची पक्की नोंद करण्यासाठी तिरपोळे (ता. चाळीसगाव) येथील मंडलाधिकाऱ्याला चार हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले.

मेहुणबारे (ता. चाळीसगाव) - खरेदी केलेल्या जमिनीची पक्की नोंद करण्यासाठी तिरपोळे (ता. चाळीसगाव) येथील मंडलाधिकाऱ्याला चार हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले.

तिरपोळे येथील तक्रारदाराने शेतजमीन खरेदी केली होती. या जमिनीच्या सातबारा उताऱ्यावर नाव लावण्यासाठी तलाठ्यांकडे सर्व आवश्‍यक त्या कागदपत्रांची पूर्तता करून दिली. तलाठ्यांनी सातबारा रेकॉर्डला त्याची नोंद घेतली. त्यानंतर ही नोंद मंजूर होण्यासाठी तलाठ्यांनी मंडलाधिकारी सोमा भिला बोरसे (वय 51) यांच्याकडे पाठविली. बोरसे यांनी नोंद मंजूर करण्यासाठी चार हजार रुपये लाचेची मागणी केली. ही लाच स्वीकारताना त्यांना पकडण्यात आले. दरम्यान, मंडलाधिकारी बोरसे यांना 2007 मध्ये उंबरखेड (ता. चाळीसगाव) येथे तलाठी म्हणून असताना एक हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले होते.

Web Title: nandalist arrested in chalisgav tahsil