traffic
sakal
नांदगाव: कन्नड घाटातील अवजड वाहतूक नांदगाव तालुक्यातून वळविल्यापासून साडेतीन वर्षात आहे त्या रस्त्यांची पुरती चाळण झाल्याने दहा किमीचे अंतर कापण्यासाठी तासाभराचा वेळ लागत आहे. याशिवाय खड्ड्यात मोठे ट्रक ट्रेलर्स व अन्य प्रकारची वाहने अडकून पडत असल्याने तासन््तास होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे वाहनधारकांसह अनेक जणांना वळसा घालण्यासाठी पर्यायी रस्ते शोधावे लागत आहेत.