नांदगावच्या अब्दुलचे जे.ई.ई परिक्षेत यश

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 12 जून 2018

नांदगाव - या वर्षीच्या आय.आय.टी. कानपुरतर्फे घेण्यात आलेल्या जे.ई.ई.अँडव्हान्स  परीक्षेत नांदगावच्या शेख अब्दुल हकीम याने यश संपदान केले आहे. देश पातळीवरील अभियांत्रिकी संस्थामधील सर्वोच्च प्रवेश परीक्षेसाठी अशा प्रकारचे यश संपदान करणारा अब्दुल हा नांदगावमधील पहिला विद्यार्थी ठरला आहे. त्याच्या या यशाचे शहरात सर्वत्र कौतुक होत आहे. 

माजी नगराध्यक्ष श्रीमती शबाना शेख व माजी नगरसेवक इक्बाल सुलतान शेख यांचा तो मुलगा आहे. त्याने २७००वे रँकिक मिळविले. नाशिकच्या आंतरराष्ट्रीय स्पेस स्कुलचा अब्दुल विद्यार्थी आहे. आजोबा शेख सुलतान बाबाजी यांनी निळ उप्तादनाच्या क्षेत्रात नाव लौकिक मिळविला तर वडील इकबाल माजी नगरसेवक तर आई शबाना यांनी क्षाराचे नगराध्यक्ष पद भूषविले आहे. 

त्यांनी आपल्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात केवळ आणले नाही तर दर्जेदार उच्च शिक्षण उपलब्ध करून दिले. त्यांच्या मुलीने नुकतेच एम.बी.बी.एस. चांगल्या श्रेणीत उत्तीर्ण केले. नांदगावसारख्या दुर्लक्षित भागातून आय.आय.टी. सारख्या क्षेत्रात यश मिळविणाऱ्या अब्दुलच्या यशामुळे सर्वत्र कौतुक होत आहे. 
 
Web Title: Nandgaon's Abdul got good marks in JEE Examination