बहिष्कृतांच्या सन्मानासाठी विभागीय आयुक्त सरसावले 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 10 नोव्हेंबर 2016

नाशिक - श्रीगोंदा तालुक्‍यातील नंदीवाले समाजातून बहिष्कृत केलेल्या साठहून अधिक कुटुंबांच्या विषयात लक्ष घालण्याचा आदेश विभागीय आयुक्त एकनाथ डवले यांनी दिला. या प्रकरणी तेथील प्रांताधिकारी व जिल्हाधिकाऱ्यांकडे बैठक घेऊन उभयतांमध्ये समेट घडविण्यासाठी पुढाकार घेण्यास सुचविण्यात आले आहे. 

नाशिक - श्रीगोंदा तालुक्‍यातील नंदीवाले समाजातून बहिष्कृत केलेल्या साठहून अधिक कुटुंबांच्या विषयात लक्ष घालण्याचा आदेश विभागीय आयुक्त एकनाथ डवले यांनी दिला. या प्रकरणी तेथील प्रांताधिकारी व जिल्हाधिकाऱ्यांकडे बैठक घेऊन उभयतांमध्ये समेट घडविण्यासाठी पुढाकार घेण्यास सुचविण्यात आले आहे. 

श्रीगोंदा (जि. नगर) येथील नंदीवाला समाजाच्या जातपंचायतीने तेथील सुमारे 60 कुटुंबांना बहिष्कृत केले आहे. समाजातून बहिष्कृत करण्याची अमानवीय प्रथा बंदीसाठी सरकारने कायदा केला आहे. अजूनही अनेक समाजांत प्रस्थापित जातपंचांकडून अन्याय होत आहे. त्याविरोधात बहिष्कृत कुटुंबांनी पोलिसांत तक्रारी करत दाद मागितली; पण अद्यापही त्याला यश आलेले नाही. त्यामुळे प्रांताधिकाऱ्यांची बैठक घेऊन दोन्ही गटांतील प्रमुखांशी चर्चा करावी, त्यानंतर पोलिस अधीक्षक आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत हे प्रकरण समन्वयाने सोडवावे, असे सांगितले. 

राज्य सरकारने कायदा केल्यानंतरही ठिकठिकाणी जातपंचायतीचे पंच व बहिष्कृत कुटुंब घटनाबाह्य प्रथा परंपरा मोडण्यासाठी एकत्र येत असताना श्रीगोंदा तालुक्‍यात त्या दिशेने प्रयत्न व्हावेत, यासाठी डवले यांनी हा आदेश दिला आहे. 

श्रीगोंदा तालुक्‍यातील नंदीवाले समाजातील दीडशेहून अधिक कुटुंबांना जातपंचायतीने बहिष्कृत केले आहे. त्यापैकी श्रीगोंदा कारखान्याच्या आसपास अशी बहिष्कृत केलेली 20 ते 25 कुटुंबे आहेत. अनेकदा जातपंचांना सांगूनही साधे बोलू दिले जात नाही. जातपंचांना दंडाच्या नावाखाली पैसे दिलेल्या कुटुंबांना मात्र समाजात सामावून घेतले जाते, अशी तक्रार उत्तम हनुमंत फुलमाळी (जेऊर, ता. नेवासा), शेटीबा काकडे (वाळकी), अण्णा फुलमाळी (रेणवाडी), सुभाष फुलमाळी (शनि शिंगणापूर), तात्या शिवराम आव्हाड (शेवगाव), रामा फुलमाळी (ओझर, ता. जुन्नर, जि. पुणे) आदींची आहे. नंदीवाला समाजाच्या जातपंचांनी समाजात सामावून घ्यावे, यासाठी त्यांचा संघर्ष सुरू आहे. 

समाजात अमानवीय पद्धतीने समाजातून बहिष्कृत केल्याप्रकरणी श्रीगोंदा पोलिसांत तक्रार दिली आहे. बहिष्कारासाठी पुढाकार घेणाऱ्या पंच कमिटीचे उत्तम फुलमाळी यांच्याविरोधात गेल्याच महिन्यात गुन्हा दाखल आहे. प्रशासकीय पातळीवरही त्यासाठी आता पाठपुरावा सुरू आहे. 

- ऍड. अरुण जाधव

Web Title: Nandivala has excluded 60 families in the community