The Maharashtra State Electricity Company Contractual Workers' Union staged a protest on Wednesday.
The Maharashtra State Electricity Company Contractual Workers' Union staged a protest on Wednesday.esakal

Nandurbar News: मागण्या मान्य न झाल्यास संपूर्ण राज्य अंधारमय; महाराष्ट्र राज्य वीज कंपनी कंत्राटी कामगार संघटनेचा इशारा

Nandubar : राज्यव्यापी आंदोलनाच्या पहिल्या दिवशी पाचव्या टप्प्याममध्ये कामबंद आंदोलन करत संप करण्यात आला. आंदोलन दोन दिवस चालणार आहे.

Nandurbar News राज्यव्यापी आंदोलनाच्या पहिल्या दिवशी पाचव्या टप्प्याममध्ये कामबंद आंदोलन करत संप करण्यात आला. आंदोलन दोन दिवस चालणार आहे. ५ मार्चपर्यंत मागण्या मान्य न झाल्यास संपूर्ण महाराष्ट्र अंधारमय होईल, असा इशारा महाराष्ट्र राज्य वीज कंपनी कंत्राटी कामगार संघटनेच्या कृती समितीने दिला.

नंदुरबार जिल्ह्यामध्ये महावितरण कंपनीतील नियमित रिक्त पदांच्या जागेवर गेली अनेक वर्षे कंत्राटी पद्धतीवर कामगार काम करत आहेत. (Nandurbar contract workers of Maharashtra State Electricity Company went on strike)

राज्यभर सुमारे हजारो वीज कंत्राटी कामगार त्यांच्या समस्या सोडविण्याच्या दृष्टिकोनातून वीज कंत्राटी कामगार आजपर्यंत मुख्यमंत्री, ऊर्जामंत्र्यांना अनेक निवेदने सादर केली, तसेच प्रत्यक्ष पत्रव्यवहार केला, विविध प्रकारची आंदोलने मंत्रालय व आझाद मैदान तसेच वीज कंपनीच्या मुख्य कार्यालयासमोर केली.

मात्र याची शासनाने कोणतीही दखल नाही. राज्यातील महावितरण, महापारेषण व महानिर्मिती कंपनीतील वर्षानुवर्षे नियमित विविध मंजूर रिक्त पदांच्या जागेवर कार्यरत असलेल्या सुमारे ४२ हजार वीज कंत्राटी कामगारांच्या हितार्थ राज्यातील ३० प्रमुख वीज कंत्राटी कामगार संघटना एकत्र येऊन महाराष्ट्र राज्य वीज मंडळ कामगार संघटना संयुक्त कृती समिती स्थापन केली आहे. (latest marathi news)

The Maharashtra State Electricity Company Contractual Workers' Union staged a protest on Wednesday.
Nandurbar Municipality News : नंदुरबार पालिकेच्या 230 कोटींच्या अंदाजपत्रकास मंजुरी

बुधवारी (ता. २८) जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. १६ फेब्रुवारीला कामगार आयुक्तांना निवेदन देण्यात आले. २१ फेब्रुवारीला विभागीय कार्यालय येथे एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले होते.

मागण्या मान्य नझाल्यास ५ मार्चपासून राज्यातील ३० संघटनांतील ४२ हजार कर्मचारी बेमुदत उपोषणास करणार असल्याने संपूर्ण महाराष्ट्र अंधारमय होईल व याची सर्वस्वी जबाबदारी शासनाची राहील, असे केंद्रीय सरचिटणीस महाराष्ट्र बाह्यस्रोत वीज कंत्राटी कामगार संघटना (इंटक) केंद्रीय सरचिटणीस रामचंद्र रामोळे यांनी सांगितले.

या वेळी जळगाव झोन अध्यक्ष करीम खाटीक, जळगाव झोन सरचिटणीस संदीप धनगर, नंदुरबार सर्कल अध्यक्ष खुशाल जाधव, नंदुरबार सर्कल सरचिटणीस प्रल्हाद कोळी, नंदुरबार सर्कल उपाध्यक्ष भरत पाटील, नंदुरबार सर्कल खजिनदार दिनेश सामुद्रे, नंदुरबार सर्कल उपसरचिटणीस गणेश साळी आदी उपस्थित होते.

The Maharashtra State Electricity Company Contractual Workers' Union staged a protest on Wednesday.
Nandurbar ZP News : जिल्हा परिषदेचे 54 कोटींचे अंदाजपत्रक जाहीर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com