Nandurbar News : जन्म पुराव्याअभावी आधारकार्ड अपडेट कामात अडचण

Nandurbar News : आधारकार्ड अपडेटसाठी जन्माचा पुरावा म्हणून जन्माचा दाखला ग्राह्य धरला जात आहे. त्यामुळे सध्या आधारकार्ड अपडेटसाठी वयोवृद्धांच्या अडचणी वाढल्या आहेत.
Aadhaar card
Aadhaar card esakal

कळंबू : आधारकार्ड अपडेटसाठी जन्माचा पुरावा म्हणून जन्माचा दाखला ग्राह्य धरला जात आहे. त्यामुळे सध्या आधारकार्ड अपडेटसाठी वयोवृद्धांच्या अडचणी वाढल्या आहेत. बहुतांश वृद्धांकडे जन्माचा दाखला नसल्याने डोकेदुखी वाढली आहे. जन्माची नोंदच नसल्याने दाखले आणावे कुठून, असा प्रश्न पडला आहे. मात्र आता सर्वच स्तरावर आधार अपडेटशिवाय शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी अडथळे येतात. (Nandurbar Difficulty in Aadhaar card update work due to lack of birth proof)

मात्र अपडेट करताना कुठे अंगठा येत नाही, तर कुठे जन्माच्या पुराव्याअभावी आधार अपडेट होत नाही, म्हणून आधारकार्ड अपडेटसाठी वृद्धांनी वयाचा दाखला आणावा कुठून, असा प्रश्न पडला आहे. मतदानकार्ड पाठोपाठ आता आधारकार्ड हा भारतीय नागरिकत्वाचा महत्त्वाचा पुरावा मानला जातो, तसेच विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी व इतर अनेक ठिकाणी आधारकार्डची मागणी करण्यात येते.

याशिवाय शासकीय योजनेत कोणतेच काम होत नाही. सध्या ग्रामीण भागातील वृद्धांना आधारकार्डमधील दोष दूर करण्यासाठी बऱ्याच त्रुटींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे कार्डधारकांना कार्डमध्ये फेरबदल करताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. अपडेट करताना जन्मतारखेचा पुरावा म्हणून जन्म दाखला देणे आवश्यक असल्याने कार्ड अपडेट होणे अशक्य झाले आहे. (latest marathi news)

Aadhaar card
Nandurbar Lok Sabha Constituency : एकीकडे बैठका, दुसरीकडे भेटीगाठी!

त्याकाळी जन्माच्या नोंदीला महत्त्व नव्हते आधी तालुक्याचे ठिकाण वगळता गावात आरोग्याच्या सोयीसुविधा उपलब्ध नसल्यामुळे महिलांची प्रसूती घरीच होत होती. त्या वेळी जन्माच्या नोंदीला फार महत्त्व नव्हते. काळानुसार जन्माची नोंदी न केल्यामुळे बऱ्याच ज्येष्ठ नागरिकांकडे जन्माचे प्रमाणपत्र नाही. संबंधित विभागाने किमान ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या आधारकार्ड, तसेच काही कारणास्तव या नागरिकांकडे प्रमाणपत्र नाही अशांचे शाळा सोडल्याचा पुरावा ग्राह्य धरावा.

आधार अपडेट करताना अनेक समस्या विविध शासकीय कामांसाठी लागणारा महत्त्वाचा पुरावा म्हणजे आधारकार्ड. त्यात शासकीय योजनांचा लाभ घ्यावयाचा असल्यास आधारकार्ड अपडेट आवश्यक असते. मात्र नेमके वृद्धांचे आधारकार्ड अपडेट होत नसल्याने ज्येष्ठ नागरिकांना शासकीय योजनांपासून वंचित राहण्याची वेळ आली आहे.

जुन्या काळातील जन्माची नोंद मिळणे कठीण असल्याने, तसेच काही कुटुंब अशिक्षित असल्याने त्यांनी जन्माची नोंद केलीच नाही. त्यामुळे जन्माचे प्रमाणपत्र आणावे कुठून, असा प्रश्न ज्येष्ठ नागरिकांना पडला आहे.

Aadhaar card
Nandurbar Ramdan Eid 2024 : रमजान ईदनिमित्त बाजारपेठेत उत्साह; ईदनिमित्त पोलिस बंदोबस्त तैनात, सीसीटीव्हीचीही करडी नजर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com