Nandurbar Dagadfek : दंगलप्रकरणी 250 जणांवर गुन्हे दाखल; जिल्हा पोलिस अधीक्षक श्रवण दत्त एस. यांची माहिती

Nandurbar Dagadfek : शहरात गुरुवारी घडलेल्या दंगलीत २१ पोलिस कर्मचारी, दोन पालिका कर्मचारी जखमी झाले. या प्रकरणी ५५ संशयितांना अटक करण्यात आली.
Dattatreya Karale, Special Inspector General of Police, Nashik area, inspecting the riot-hit areas on Friday. Neighboring District Superintendent of Police Shravan Dutt S., Sub Divisional Police Officer Sanjay Mahajan, police officers and staff etc.
Dattatreya Karale, Special Inspector General of Police, Nashik area, inspecting the riot-hit areas on Friday. Neighboring District Superintendent of Police Shravan Dutt S., Sub Divisional Police Officer Sanjay Mahajan, police officers and staff etc.esakal
Updated on

नंदुरबार : शहरात गुरुवारी घडलेल्या दंगलीत २१ पोलिस कर्मचारी, दोन पालिका कर्मचारी जखमी झाले. या प्रकरणी ५५ संशयितांना अटक करण्यात आली. त्यात चार विधिसंघर्षित बालकांचा समावेश आहे. तसेच ५४ निष्पन्न संशयित फरारी आहेत. इतर २५० जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. सध्या शहरात शांतता असून, जनजीवन पूर्वपदावर येत असल्याचे जिल्हा पोलिस अधीक्षक श्रवण दत्त एस. यांनी सांगितले. गुरुवारी (ता. १९) दोन गटांत दगडफेक झाली. त्याचे पर्यवसान दंगलीत झाले. (District Superintendent of Police Shravan Dutt has filed case against 250 people in riot case )

दुपारी तीन ते सव्वापाचच्या दरम्यान ही घटना घडली. घटनेत महात्मा फुले पुतळ्याजवळ, रामरहीम चौकी, ईलाही चौक, चिराग अली मशीद, भद्रा चौक, बोढरा गल्ली, करीम मंजील, नवनाथ टेकडी शादुर्लानगर, शाळा क्रमांक ९ या परिसरात दोन गटांत दंगल झाली. या घटनेत २१ पोलिस कर्मचारी, दोन पालिका कर्मचारी जखमी झाले. तसेच सहा शासकीय, २१ खासगी वाहने, तसेच काही घरे व दुकानांची जाळपोळ करण्यात आली.

सहाय्यक निरीक्षक रमेश वावरे यांच्या फिर्यादीवरून सुमारे अडीचशे जणांविरुद्ध खुनाचा प्रयत्न, बेकायदेशीर जमावाचा सदस्य, फौजदार बलप्रयोग करणे, लोकसेवकाला दुखापत, मालमत्ता नुकसान, घातक हत्याराने जबर दुखापत करणे, बेकायदेशीर जमाव, दंगा करणे, ज्वलनशील पदार्थाने आगळीक करणे, सुरक्षितता धोक्यात आणणारी कृती, हल्ल्याच्या उद्देशाने गृहअतिक्रमण, धार्मिकस्थळ विटंबनेसह सार्वजनिक मालमत्ता नुकसान प्रतिबंधक कायद्यासह गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी पोलिसांकडून दोन्ही गटांतील संशयितांची धरपकड सुरू आहे.

Dattatreya Karale, Special Inspector General of Police, Nashik area, inspecting the riot-hit areas on Friday. Neighboring District Superintendent of Police Shravan Dutt S., Sub Divisional Police Officer Sanjay Mahajan, police officers and staff etc.
Nandurbar Crime : बिबट्याची कातडी विकणारी टोळी गजाआड; मुंबई, तळोदा वनविभागाची कारवाई

नागरिकांनी अफवांवर विश्‍वास ठेवू नये : कराळे

घटनेची माहिती मिळताच गुरुवारी रात्री नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक दत्तात्रेय कराळे यांनी नंदुरबारला भेट देत दंगलग्रस्त भागाची पाहणी केली. त्यांच्यासोबत जिल्हाधिकारी मिताली सेठी, जिल्हा पोलिस अधीक्षक श्रवण दत्त एस., उपविभागीय पोलिस अधिकारी संजय महाजन उपस्थित होते. पाहणीनंतर माळीवाडा परिसरात त्यांनी समाजातील प्रतिष्ठित नागरिकांची बैठक घेत शांतता राखण्याचे तसेच संशयितांच्या अटकेसाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले.

शुक्रवारी (ता. २०) दिवसभर महानिरीक्षक कराळे नंदुरबारला होते. त्यांनी सीसीटीव्ही, व्हिडिओवरून समाजकंटकांना निष्पन्न करण्याचे काम सुरू असून, तंत्रज्ञान उपलब्ध असल्याने आता आरोपी निष्पन्न होण्यास वेळ लागणार नाही. गुन्हेगारांना माफी नाही. निष्पाप असतील तर त्यांची खात्री केली जाईल, अन्याय कोणावरही होणार नाही. नागरिकांनी अफवांवर विश्‍वास ठेवू नये, अफवा पसरविणारे अथवा दिशाभूल करणारे व्हिडिओ, फोटो आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. नागरिकांनी शांतता ठेवावी. परिस्थिती आटोक्यात असल्याचेही कराळे यांनी सांगितले.

Dattatreya Karale, Special Inspector General of Police, Nashik area, inspecting the riot-hit areas on Friday. Neighboring District Superintendent of Police Shravan Dutt S., Sub Divisional Police Officer Sanjay Mahajan, police officers and staff etc.
Nandurbar Dagadfek: दगडफेकीमागचं नेमकं कारण काय? पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती | Marathi news

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com