SAKAL Exclusive : बोरद येथील वीज वितरण कार्यालयाला दुर्गंधीचा ‘शॉक’

Nandurbar News : परिसरातील ४५ गावे, २५ हजार लोकांना घरगुती तसेच शेती कामासाठी वीजपुरवठा करण्याकरिता उपकेंद्र अनेक वर्षांपासून कार्यान्वित आहे.
Dirt empire next to electricity distribution office.
Dirt empire next to electricity distribution office.esakal

Nandurbar News : परिसरातील ४५ गावे, २५ हजार लोकांना घरगुती तसेच शेती कामासाठी वीजपुरवठा करण्याकरिता उपकेंद्र अनेक वर्षांपासून कार्यान्वित आहे. अशा उपकेंद्राला घाणीच्या साम्राज्याने वेढल्याचे सध्या विदारक चित्र आहे. बोरद येथे विद्युत वितरण कंपनीचे उपकेंद्र कार्यान्वित असून, याच ठिकाणी विद्युत वितरणचे कार्यालयदेखील आहे. (Nandurbar Electricity distribution office in Borsad stinks because of garbage)

या कार्यालयात उपअभियंता यांचे पद कार्यान्वित असून, त्यांच्या हाताखाली १६ कर्मचारी कार्यरत आहेत. या कार्यालयामार्फत बोरद परिसरात असलेल्या साधारणतः ४५ गावांना वीजपुरवठा करण्यात येत असतो. यात घरगुती वापराबरोबरच शेतीलादेखील विजेचा पुरवठा करण्यात येतो. यासाठी या ठिकाणी पाच फीडर कार्यान्वित आहेत.

त्यात दोन फीडर घरगुती (गावातील) ग्राहकांसाठी वापरले जातात, तर दोन फीडरच्या माध्यमातून शेतीसाठी विजेचा पुरवठा करण्यात येतो व एक बोरद येथे असलेल्या जिनिंग व प्रेसिंग राखीव ठेवण्यात आले आहे. एखाद्या शेतकऱ्याला किंवा ग्राहकाला कार्यालयात काही कामानिमित्त यावे लागत असते.

परंतु सद्यःस्थितीत गेल्या अनेक वर्षांपासून या कार्यालयाला मानवी विष्ठा तसेच घाणीच्या साम्राज्याने वेढले आहे. सकाळी सातपासून तर दुपारी अकरापर्यंत कुठलाही मनुष्य या ठिकाणी जाताना नाक बंद करूनच जात असतो. कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळच मानवी विष्ठा मोठ्या प्रमाणात आढळून येते. त्यामुळे संपूर्ण परिसरात दुर्गंधी पसरते. (Latest Marathi News)

Dirt empire next to electricity distribution office.
Nandurbar News : तळोद्यात उदमांजराच्या दर्शनाने शेतकऱ्यांना दिलासा; जैवविविधता टिकावी ही प्राणीप्रेमी शेतकऱ्यांची अपेक्षा

दैनंदिन कामावर येणाऱ्या कर्मचाऱ्यांना नाहक या सर्व गोष्टींचा त्रास सहन करावा लागतो. तक्रार करावी किंवा समज द्यावी तर कोणीही समोर आढळून येत नाही. त्यामुळे सध्या अशा लोकांचे फावले आहे. शेजारीच ग्रामपंचायतीतर्फे या समस्येच्या निवारणासाठी सार्वजनिक शौचालयाची निर्मितीदेखील करण्यात आलेली आहे.

परंतु शौचालयाचा वापर न करता नागरिक रस्त्यालगतच शौचविधी पार पाडत असतात. यामुळे तसेच शौचालयाच्या पाण्यामुळे परिसरात संपूर्ण घाणीचे साम्राज्य निर्माण होते. वास्तविक पाहता शासनातर्फे हागणदारीमुक्त कार्यक्रम राबविण्यात आला होता.

याअंतर्गत संपूर्ण नंदुरबार जिल्हा हागणदारीमुक्त झाल्याचे चित्र निर्माण करण्यात आले आहे; परंतु आजच्या घडीला गावागावांत सकाळीच उघड्यावर प्रातर्विधीला जाणाऱ्या लोकांची संख्या कमी नाही. प्रत्येकाला घरी शौचालय देण्यात आले आहे तर मग नागरिक प्रातर्विधीसाठी बाहेर का म्हणून पडतात, असा प्रश्न निर्माण होत आहे.

Dirt empire next to electricity distribution office.
Nandurbar Lok Sabha Election : नंदुरबारमध्ये 10 ला पंतप्रधान मोदींची सभा

"मी व माझे कर्मचारी आमचे नियमित कर्तव्य बजावण्यासाठी कार्यालयात येत असतो; परंतु कार्यालयात प्रवेश करत असताना पायी जाणे शक्य होत नाही. बऱ्याच वेळा वाहनांच्या चाकांनासुद्धा मानवी विष्ठा लागलेली आढळून येते. अशा वेळेस काय करावे हे आम्हाला सुचत नाही. मी ग्रामपंचायत प्रशासनाला याबाबत लेखी निवेदन सादर करणार आहे. कर्मचाऱ्यांच्या आरोग्याचा प्रश्नदेखील निर्माण होऊ शकतो." - जसपाल गिरासे, उपअभियंता विद्युत वितरण कार्यालय, बोरद (ता. तळोदा)

"वीज वितरण कार्यालयाचा हा प्रश्न खरोखरच गंभीर असून, त्याचे निवारण करण्यासाठी आधी असलेल्या शौचालयाव्यतिरिक्त आम्ही पुन्हा नव्याने एक शौचालय तेथे बांधून दिलेले आहे; परंतु नागरिक शौचालयाचा वापर न करता उघड्यावरच शौचास प्राधान्य देतात. या बाबीचा गांभीर्याने विचार करून यावर योग्य तो मार्ग काढण्यात येईल." -विजय पाटील, ग्रामविकास अधिकारी, बोरद (ता. तळोदा)

Dirt empire next to electricity distribution office.
Nandurbar Summer Heat : तळोद्यात पारा चढला! 42 अंश सेल्सिअसहून अधिक तापमानामुळे अंगाची लाहीलाही

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com