Nandurbar Holi Festival : जिल्ह्यात पारंपरिक पद्धतीने होलिकोत्सव जल्लोषात

Nandurbar Holi Festival : नंदुरबार जिल्हा व होळी सणाचे आगळेवेगळे वैशिष्ट्य आहे. येथील सातपुड्यातील होलिकोत्सवाची ख्याती सातासमुद्रापार पोचली आहे. काठीची राजवाडी होळीचा इतिहासच न्यारा आहे.
Men and women showing offerings to Holi in Srikrishnanagar in the evening.
Men and women showing offerings to Holi in Srikrishnanagar in the evening.esakal

Nandurbar Holi Festival : नंदुरबार जिल्हा व होळी सणाचे आगळेवेगळे वैशिष्ट्य आहे. येथील सातपुड्यातील होलिकोत्सवाची ख्याती सातासमुद्रापार पोचली आहे. काठीची राजवाडी होळीचा इतिहासच न्यारा आहे. त्यामुळे नंदुरबार जिल्ह्यात आजपासून होलिकोत्सवास प्रारंभ झाला. मात्र सातपुड्यात पुढील आठवडाभर वैशिष्ट्यपूर्ण होलिकोत्सव जल्लोषात होणार आहे. सातपुड्यात ढोल, बिरीचा आवाज गुंजणार आहे. त्या क्षणाचे हजारो आबालवृद्ध साक्षीदार होणार आहेत. (Nandurbar Holi festival celebration in traditional way in district)

रविवारी (ता. २४) तिथीनुसार सर्वत्र होळी सण केला जात आहे. त्यासाठी सकाळपासूनच नेहमी होळी प्रज्वलित केली जाते. त्या ठिकाणी होळीचा दांडा गाढण्यासाठी खड्डा खोदण्यात आला. परिसरातून शेणाच्या गोवऱ्या, पालापाचोळा, तुरीच्या काड्या, लाकडे आणून ठेवण्याची लगबग सुरू होती. तसेच होळीसाठी लागणारा दांडा जंगलातून आणण्यात आला.

शहरी भागात वारुळाच्या झाडाचा दांडा गाढला जातो. तसे नियोजन करण्यात आले होते. नंदुरबार शहरात बालाजी वाड्यातील मानाची होळी सायंकाळी सातला प्रज्वलित करण्यात आली. तेथील पेटती मशाल घेऊन पुढे गणपती मंदिरासमोर व अंबिका मंदिराची होळी प्रज्वलित करीत वसाहतीतील नागरिक आपापल्या परीने मशालीद्वारे आपल्या परिसरातील होळी प्रज्वलित करत होते.

काही वसाहतींमध्ये स्थानिक स्तरावर प्रतिष्ठित व्यक्तींच्या हस्ते पूजाविधी करून होळी प्रज्वलित केली. कायदा व सुव्यवस्था राहावी म्हणून चौकाचौकांत पोलिसांचा बंदोबस्त चोख ठेवण्यात आला आहे. ग्रामीण भागात सरपंच अथवा पोलिसपाटील यांच्या हस्ते होळीची पूजा करून प्रज्वलित करण्यात आली. त्यानंतर महिला-पुरुषांनी घरात तयार केलेल्या गोडधोड पदार्थांचे नैवेद्य दाखविले. या वेळी स्थानिक बोलीभाषेतील गीते महिलांनी सादर केली. (latest marathi news)

Men and women showing offerings to Holi in Srikrishnanagar in the evening.
Nandurbar Lok Sabha 2024: जुन्या पटावर ‘जुनीच’ प्यादी! गावितांना उमेदवारी देऊन भाजपची सुरक्षित खेळी तर काँग्रेसने पाडवींच्या मुलाला दिली संधी

सातपुड्यातील होळीपर्वाला प्रारंभ

रविवारी सार्वजनिक होळी झाली असली, तरी सातपुड्यात मात्र आठवडाभर होलिकोत्सवाचा जल्लोष असतो. सोमवारी (ता. २५) काठी (ता. अक्कलकुवा) येथील राजवाडी होळी प्रज्वलित झाल्यानंतर वेगवेगळ्या गावांत मानाच्या किंवा राजेशाही अथवा तेथील मानकऱ्यांचे वैशिष्ट्य असलेला होलिकोत्सव केला जातो.

त्यानिमित्ताने दऱ्या-कपाऱ्यांतील प्रत्येक जण होळीत सहभागी होतो. पारंपरिक पेहराव, डोक्यावर मोरपंखी टोप, बावा-बुध्या, म्होरक्‍या असे रूप धारण करतात. होळीच्या ठिकाणी ढोलाच्या तालावर तासन तास आबालवृद्ध नृत्य करतात.

काही ठिकाणी ढोल स्पर्धांनी सातपुडा गुंजून उठतो. पुढील आठवडाभर हा जल्लोष सुरू राहणार आहे. काठीची राजवाडी होळी पाहण्यासाठी मोठ्या शहरांमधून पाहुणे दाखल होऊ लागले आहेत.

Men and women showing offerings to Holi in Srikrishnanagar in the evening.
Nandurbar News : लोकनायक सूतगिरणीच्या अध्यक्षपदी दीपक पाटील

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com