Nandurbar News : नंदूरबारमध्ये भर रस्त्यात तरुणाची हत्या, घटनेचा व्हिडिओ व्हायरल; निषेध मोर्चाला हिंसक वळण

Nandurbar Crime : नंदूरबामध्ये १६ सप्टेंबर रोजी दोन युवकांचा वाद झाला यात एक जण गंभीर जखमी झाला. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले पण उपचारदरम्यान मृत्यू झाला. मात्र आता या वादाचा व्हिडिओ समोर आला आहे.
Nandurbar News : नंदूरबारमध्ये भर रस्त्यात तरुणाची हत्या, घटनेचा व्हिडिओ व्हायरल; निषेध मोर्चाला हिंसक वळण
Updated on

Summary

  1. नंदुरबारमध्ये दोन युवकांतील वादातून झालेल्या हल्ल्यात जय वळवी गंभीर जखमी झाला आणि उपचारादरम्यान मृत्यू पावला.

  2. आरोपी सूर्यकांत मराठे याने भररस्त्यावर जय वळवीवर चाकू हल्ला केला होता.

  3. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून त्याचे फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.

नंदूरबारमध्ये दोन युवकांमध्ये झालेल्या मारहाणीच्या घटनेत त्यातील एक युवक गंभीर जखमी झाला मात्र त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली. यानंतर बुधवारी या आदिवासी युवकाच्या खुनाच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालयावर काढलेल्या मोर्चाला हिंसक वळण लागले. जिल्हाधिकारी कार्यालयावर दगडफेक करण्यात आली. दरम्यान दोन युवकांच्या वादाचा जुना व्हिडिओ समोर आला आहे, जो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com