Nandurbar Lok Sabha Constituency : 45 वर्षात मतदान केंद्र ,मतदारसंख्येत अडीच पटीने वाढ! गाव, शहरांच्या विस्ताराचा परिणाम

Political News : नंदुरबार लोकसभा मतदारसंघात १९८० मध्ये म्हणजेच ४५ वर्षापूर्वीचा विचार केला तर मतदान केंद्र व मतदार संख्येत सुमारे अडीच पेक्षा जास्त पटीने वाढ झाली आहे.
voters
votersesakal

नंदुरबार : नंदुरबार लोकसभा मतदारसंघात १९८० मध्ये म्हणजेच ४५ वर्षापूर्वीचा विचार केला तर मतदान केंद्र व मतदार संख्येत सुमारे अडीच पेक्षा जास्त पटीने वाढ झाली आहे. मतदार संघ तोच व त्याच तालुक्यांचा समावेश मात्र वाढती लोकसंख्या आणि गावांसह शहरांच्या विस्तारामुळे मतदारांसोबतच मतदान केंद्रांचाही विस्तार झाल्याने आज २०२४ च्या लोकसभा निवडणुकीपर्यंत मतदान केंद्रांची संख्या २११५ तर मतदारांची संख्या १९ लाख ५८ हजार ३५३ एवढी झाली आहे. (Nandurbar Lok Sabha election 2024 Constituency marathi news)

नंदुरबार लोकसभा मतदारसंघात आजच्या नंदुरबार जिल्ह्यातील सहा तालुक्यांसह शिरपूर व साक्री तालुक्याचाही समावेश आहे. धुळे जिल्ह्यातून नंदुरबार जिल्ह्याचे विभाजन झाल्यानंतरही धुळे जिल्ह्यातील शिरपूर व साक्री तालुका मतदारसंघाचा नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील समावेश जैसे थेच आहे.

नंदुरबार लोकसभा मतदार संघ १९९९ पर्यंत धुळे जिल्ह्यात समाविष्ट होता. त्यात आताचा नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार, नवापूर, तळोदा, शहादा व अक्राणी (धडगाव) या पाच विधानसभा मतदारसंघाचा तर आताच्या धुळे जिल्ह्यातील शिरपूर मतदारसंघांचा समावेश होता.

असे सहा विधानसभा मतदारसंघातील मतदारसंख्येच्या गोळा बेरजेने नंदुरबार लोकसभा मतदारसंघाची निर्मिती केली गेली आहे. १९८० च्या लोकसभा निवडणुकीचा विचार केल्यास त्यावेळी कॉंग्रेसतर्फे पहिले उमेदवार सुरूपसिंग हिऱ्या नाईक हे होते.

तर आताचे भाजप व तेव्हाच्या जनता पक्षाकडून कुंवरसिंग फुलजी वळवी, अपक्ष म्हणून रूपसिंग नरशी गावित व श्रीमती भुरीभाई मानसिंग हे चार उमेदवार निवडणुक रिंगणात होते. त्यात सुरूपसिंग हिऱ्या नाईक हे एक लाख ९६ हजार ३३५ मतांनी विजयी झाले होते.तर कुंवरसिंग वळवी यांना एक लाख पाच हजार ५५० मते मिळाली होती.

१९८० चा विचार केल्यास नंदुरबार लोकसभा मतदारसंघात एकूण ८२७ मतदान केंद्र होते. तर सहा लाख ३२ हजार ३५५ मतदार होते. त्यात महिला अधिक होत्या. आजही महिला मतदारांची संख्या अधिकच आहे. मतदार संघनिहाय मतदान केंद्र संख्या व मतदार संख्या (कंसात ) अशी - नवापूर विधानसभा : १४५ (१,१६,२८५), नंदुरबार : १५२ (१,१९,५२३), तळोदे : १४१ (९१,१५६), अक्राणी : ११७ ( ८६,६१४), शहादा : १४३ ( १,११,१२०), शिरपूर : १४९ (१,०७,६५७). एकूण मतदान केंद्राची संख्या ८२७ तर मतदार संख्या ६ लाख ३२ हजार ३५५ एवढी होती.

त्यानंतर २००९ मध्ये विधानसभा मतदारसंघांची पुनर्रचना झाली. त्यात अक्कलकुवा -अक्राणी ,तळोदा -शहादा, नवापूर व नंदुरबार असे पाच विधानसभा मतदारसंघाएवजी चार मतदार संघ तयार झाले. त्यामुळे या मतदारसंघांमध्ये शिरपूर जैसे थे ठेवत साक्री मतदारसंघाचा समावेश करण्यात आला.

त्यावेळी मतदार केंद्रांची संख्या १८४६ तर मतदारांची संख्या १४ लाख ५८ हजार ९६० एवढी होती. हिच संख्या आताचा २०२४ च्या निवडणुक कार्यक्रमानुसार विचार केल्यास मतदान केंद्रांची संख्या २११५ तर मतदार संख्या १९ लाख ५८ हजार ३५३ एवढी झाली आहे. ४५ वर्षात वाढत्या लोकसंख्येबरोबर मतदान केंद्रही वाढविण्याची वेळ शासन-प्रशासनावर आली आहे. (latest marathi news)

voters
Raver Lok Sabha Constituency : सहानुभूतीच्या लाटेवर रवींद्र पाटील होणार स्वार! शरद पवार गट खेळणार 'मराठा कार्ड'

१९८० ची मतदान केंद्र व मतदार संख्या विधानसभा मतदार संघानिहाय अशी -

मतदार संघ - मतदान केंद्र - मतदार संख्या

नवापूर - १४५ -११,६,२८५

नंदुरबार - १५२ -१,१९,५२३

तळोदे - १४१ - ९१,१५६

अक्राणी - ११७ - ८६,६१४

शहादा - १४३ - १,११,१२०

शिरपूर - १४९ -१,०७,६५७

---------------------------------------

एकूण - ८२७ - ६ लाख ३२ हजार ३५५

--------------------------------------

२०२४ चे मतदान केंद्र व मतदार संख्या विधानसभा मतदार संघनिहाय अशी -

मतदार संघ - मतदान केंद्र - मतदार संख्या

नवापूर -३३६ -२,८९,३०१

नंदुरबार - ३६२ -३,४०,८९६

अक्राणी -अक्कलकुवा - ३५५- ३,०४,३३७

शहादा -तळोदा - ३५९ - ३,४०,४४१

साक्री - ३७० -३,५२,९०१

शिरपूर - ३३३ -३,३०,४७७

---------------------------------------

एकूण - २११५ - १९ लाख ५८ हजार ३५३

voters
Nashik Lok Sabha Election 2024 : आमदारही म्हणतात खासदार कमळाचाच...! शिंदे सेनेच्या मागणीला मुंबईत प्रत्युत्तर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com