Nandurbar News : दुष्काळात तेरावा महिना; शेणखताचे भाव वाढले! मातीचा कस आला शून्यावर, उत्पन्नाचीही मारामार

Nandurbar News : शेतीसाठी महत्वाचा घटक असलेल्या शेणखताचे दर वाढल्याने शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट उभे आहे.
manure
manure esakal

मंदाणे : आधीच दुष्काळी परिस्थिती, त्यात पशुधन घटल्याने आता शेणखतालाही सोन्याचे दिवस आले आहे. शेतीसाठी महत्वाचा घटक असलेल्या शेणखताचे दर वाढल्याने शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट उभे आहे. पाणीटंचाईमुळे जनावरांच्या चारा-पाण्याचा प्रश्‍न बिकट होत असताना शेतीसाठी लागणारे शेणखत महागल्याने जमिनीचा पोत टिकवून ठेवण्याचे आव्हान शेतकऱ्यांसमोर आहे. (Nandurbar Manure price increase)

भारत कृषीप्रधान देश असल्याने येथे मोठ्या प्रमाणावर शेती व्यवसाय केला जातो. शेतकऱ्यांकडील पशुधन पूर्वीच्या तुलनेत कमी झाल्याने शेतीमध्ये शेणखताचा वापर कमी झाला आहे. परिणामी, रासायनिक खतांमुळे जमिनीचा पोत खालवत चालला आहे. सद्यस्थितीत २५०० ते ३००० रुपये ब्रास ट्रॉलीने खत मिळत आहे.

ग्रामीण भागात पशुधन कमी झाल्याने शेण खताचा तुटवडा निर्माण झाला. शेणखत शेतीसाठी अत्यंत फायदेशीर असून, या खताचा वापर केल्यास जमिनीची पोत सुधारतो. मानवी आरोग्यासाठी शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीकडे वळण्याची गरज आहे. सद्यस्थितीत कृषी दिनानिमित्त शेतजमिनीसाठी खताचे महत्व कृषी विभागाकडून अधोरेखित झाले आहे.

शासनाच्या कृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्यात येत असून, रासायनिक खतांचा वाढलेला वापर व उत्पादन वाढण्याची स्पर्धा यामुळे रासायनिक खते व कीटकनाशकांच्या अतिवापराने मानवी आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी माती परीक्षण करून शेत जमिनीची आरोग्यपत्रिका तयार करणे व त्यानुसार जमिनीला कोणते घटक आवश्यक आहे तीच मात्रा देण्याची गरज निर्माण झाली आहे. (latest marathi news)

manure
Nandurbar Lok Sabha Constituency : एकीकडे बैठका, दुसरीकडे भेटीगाठी!

विविध पिके घेतल्यानंतर जमिनीतील निघणारा पालापाचोळा, विविध पिके घेतल्यानंतर जमिनीतील निघणारा पालापाचोळा व त्यात शेणखत टाकून त्याचे कंपोस्ट खत तयार करता येते. सध्या शेणखत दुर्मिळ झाल्याची स्थिती निर्माण झाली आहे. पूर्वी शेतकऱ्यांकडे मोठ्या प्रमाणात असलेली जनावरे कमी झाली आहेत.

कंपोस्ट खतनिर्मितीची गरज

शेणखत विकत घेणे हे सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरचे झाले आहे. सध्या २५०० ते ३००० रुपये ब्रास ट्रॉली याप्रमाणे खत विकत घ्यावे लागत आहे. सर्वसाधारण एकरी पाच ते सहा ब्रास शेणखत वापरणे गरजेचे आहे. एकरी जवळपास ३५ हजार रुपये खर्च करावा लागतो. त्याचा काटकसरीने वापर केला तरी निदान २५००० तरी खर्च करणे गरजेचे आहे. हा खर्च सर्वसामान्य शेतकऱ्यांना परवडणारा नाही. शेतकऱ्यांनी उत्पादन खर्च कमी करून शेणखताबतच कंपोस्ट खत निर्मिती करण्याचे आवाहन कृषि विभागाने केले आहे.

रासायनिक खताचे दुष्परिणाम

शेतीमध्ये रासायनिक खतांचा अधिक वापर केल्याने जमिनीचा पोत खराब होतो. पर्यायाने शेतजमीन भविष्यात नापीक होण्याचा धोका संभवतो. पिकावर कीड व रोगांचा प्रादुर्भाव वाढत जातो. रासायनिक खतामुळे पाण्याचे स्त्रोतही दूषित जमिनीतील कस टिकवून ठेवण्यासाठी उपयुक्त जीवाणूंना मारक ठरतात. रासायनिक खतांच्या दरातही मोठी वाढ झाली आहे. दुसरीकडे शेणखताचा भावही चांगलाच वाढला आहे.

manure
Nandurbar Water Scarcity : नंदुरबारवाशियांनो, पाणी जरा जपून वापरा! शहाराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणात अत्यल्प साठा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com