नंदुरबार जिल्हा परिषदेत कॉंग्रेसची आगेकूच 

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 8 January 2020

नंदुरबारः जिल्ह्या परिषदेच्या अतिशय चुरशीच्या निवडणुकीत दुपारी बारापर्यत जाहीर निकालात भाजपने आठ आणि कॉंग्रेसच्या अकरा तर शिवसेनेने चार आणि राष्टवादीने तीन जागा जिंकल्या आहेत. यात माजी आमदार व शिवसेना नेते चंद्रकांत रघुवंशी यांचे पुत्र राम रघुवंशी कोपर्ली गटातून दणदणीत साडेतीन हजार मतांनी विजयी झाले आहेत. शहाद्यातील कॉंग्रेसचे नेते अभिजित पाटील हे म्हसावद गटातून विजयी झाले आहे. 
कोळदा गटातून भाजपच्या योगिनी भारती, पातोंडा गटातून भाजपच्या विजया गावित, अक्कलकुव्यात भाजपचे कपिल चौधरी, खोंडामळी गटातून भाजपचे शांताराम पाटील, खेडदिगर गटातून भाजपच्या वंदन पटले विजयी झाल्या. 

इतर निकाल असे ः शहादा तालुका ः कंसाई गट (काँग्रेस विजयी) ः १)नाईक रजनी सुरेश-4839 
गण- रंगीलिबाई आपसिंग पावरा- 1845, पावरा विजयसिंग वण्या- 2058 राणीपूर 
म्हसावद गट-(काँग्रेस-विजयी) ः १) अभिजित मोतीलाल पाटील-4937. म्हसावद गण- १) वळवी सत्तेन मधुकर- 2650. तलावडी ः ठाकरे कमलबाई जाधव- 2974. 
सुल्तानपूर गट-(काँग्रेस-विजयी) ः पावरा कविता योगेश-5273 
सुलतानपूर गण- १) पाटील वैशाली किशोर- 2959. सुलवाडा गण ः पवार रमणबाई शिवाजी -2686. 

मंत्री पाडवींच्या पत्नी पराभूत 
तोरणमाळ गटातून प्रथमच निवडणूक लढविणाऱ्या आदिवास विकासमंत्री के.सी. पाडवी यांच्या पत्नी हेमलताबाई पाडवी या पराभूत झाल्या आहेत. शिवसेनेचे धडगाव तालुकाप्रमुख गणेश पराडके यांनी त्यांचा पराभव करीत विक्रम केला आहे. 
नवापूर तालुक्यात खांडबारा गटातून कॉंग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष दिलीप नाईख यांचा पराभव झाला आहे. तेथे राष्टॅवादीचे धरमसिंग इज्या वसावे यांनी पराभूत केले आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nandurbar marathi news jilaha parishad election