esakal | आदिवासी जिल्ह्यातील गरिबाचा कमोड ठरला उत्कृष्ट 
sakal

बोलून बातमी शोधा

आदिवासी जिल्ह्यातील गरिबाचा कमोड ठरला उत्कृष्ट 

नंदुरबार जिल्हयाच्यावतीने नळवे (ता.नंदुरबार) येथील विद्या विकास मंडळ संचालित भाग्यचिंतन माध्यमिक विद्यालयाची विद्यार्थीनी मोगरा राजकुमार पाडवी हिने सादर केलेल्या गरिबांचा कामोड उपकरणाची राष्ट्रीय स्तरावर निवड झाली आहे. 

आदिवासी जिल्ह्यातील गरिबाचा कमोड ठरला उत्कृष्ट 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नंदुरबार : अमरावती येथील सिपना अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयात नुकत्याच झालेल्या इन्स्पायर ऍवॉर्ड प्रदर्शनाच्या राज्यस्तरीय स्पर्धेत नंदुरबार जिल्हयाच्यावतीने नळवे (ता.नंदुरबार) येथील विद्या विकास मंडळ संचालित भाग्यचिंतन माध्यमिक विद्यालयाची विद्यार्थीनी मोगरा राजकुमार पाडवी हिने सादर केलेल्या गरिबांचा कामोड उपकरणाची राष्ट्रीय स्तरावर निवड झाली आहे. 

इन्स्पायर ऍवॉर्ड प्रदर्शनाचा समारोपप्रसंगी उपस्थित राज्य विज्ञान शिक्षण संस्था, रविनगर चे संचालक रवींद्र रमतकर तसेच शिक्षण संचालक दिनकर पाटील, अमरावती विभागाचे शिक्षण उपसंचालक अंबादास पेंदार यांच्या हस्ते प्रशस्तिपत्र देऊन पुरस्कार प्राप्त विद्यार्थिनीचा गौरव करण्यात आला. गरिबांचा कामोड या उपकरणाद्वारे अत्यल्प खर्चात घरगुती स्वरुपात वेस्टर्न कमोड बनविता येतो व तो गरोदर महिला, दिव्यांग व्यक्ती, गरीब व गरजू वृद्ध व्यक्तींसाठी उपयुक्त असून अत्यल्प खर्चात उपलब्ध होणारा आहे. हे मोगरा पाडवी हिने या प्रदर्शनातून पटवून दिले आहे. त्यामुळे राज्यातून राष्ट्रीय पातळीवरील प्रदर्शनासाठी निवडण्यात आलेल्या तीन उपकरणांमध्ये मोगरा पाडवीचा गरिबांचा कमोडनेही बाजी मारली आहे. या उपकरणाची राष्ट्रीयस्तरावर झालेल्या निवडीबद्दल मोगरा पाडवी व तिचे मार्गदर्शक शिक्षक भिका भोई , सचिन बागुल यांचे शिक्षणाधिकारी एम.व्ही.कदम, संस्थाध्यक्ष देवराम पाटील, सचिव मधुकर पाटील, मुख्याध्यापक राहुल खैरनार तसेच नंदुरबार जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष मुकेश पाटील, कार्याध्यक्ष कुंदन पाटील यांनी अभिनंदन केले आहे. राज्यस्तरीय सहभागाकरिता शिक्षण उपनिरीक्षक चंद्रकांत पाटील व दिनेश देवरे तसेच प्रा. नितीन देवरे यांचे सहकार्य लाभले 
 

आर्वजून पहा : वय अवघे पाच वर्ष अन्‌ नऊ सुवर्ण पदकांची कमाई