

Nandurbar News : नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १८ जागांसाठी ९१ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. (Nandurbar Market Committee Election 54 out of 91 people withdrawn on last day nandurbar news)
गुरुवारी (ता. २०) माघारीच्या शेवटच्या दिवशी ५४ जणांनी अर्ज मागे घेतल्याने ३७ जण निवडणूक रिंगणात राहिले आहेत. त्यामुळे निवडणुकीत आमनेसामने लढती रंगणार आहेत. त्यामुळे निवडणुक चुरशीची होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समिती ही खानदेशातच नव्हे तर राज्यात प्रसिद्ध आहे. येथील उलाढाल मोठी व व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांना दिले जाणारे रोखीने पैसे यामुळे इतर जिल्ह्यांतील शेतकरीही येथे धान्य विक्रीसाठी येतात. त्यामुळे या बाजार समितीवर वर्चस्व असणे हे नक्कीच राजकीयदृष्ट्या प्रतिष्ठेचे ठरते.
सध्या या बाजार समितीच्या १८ संचालकांच्या निवडणुकीसाठी प्रक्रिया सुरू आहे. अर्ज दाखल करण्याच्या अंतिम दिवशीपर्यंत ९१ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. आज शेवटच्या दिवसापर्यंत ५४ जणांनी माघार घेतली. त्यात राजकीय नेत्यांनी अनेक इच्छुकांची समजूत काढत अर्ज मागे घेण्यास भाग पाडले. त्यासाठी तारेवरची कसरत करावी लागली.
हेही वाचा : What Is Moksha: ‘अण्णा तुमच्या गुरूला मिळाला का मोक्ष?’
माघारीअंती सध्या निवडणुकीच्या रिंगणात ३७ अर्ज शिल्लक आहेत. म्हणजेच १८ जागांसाठी दोन गटांत समोरासमोर लढत रंगणार असल्याचे स्पष्ट झाले. त्यात जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित व माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या गटात समोरासमोर लढत होत आहे.
दोन्ही नेत्यांसाठी ही निवडणुक राजकीयदृष्ट्या प्रतिष्ठेची ठरणार आहे. त्यामुळे दोन्ही नेत्यांनी ही निवडणूक जिंकण्यासाठी चंग बांधला आहे. सध्या माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांचे वर्चस्व होते. आता पुढील चित्र लवकरच स्पष्ट होईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.