संशयित मुलांना लपविणाऱ्या पित्यांविरुध्द गुन्हा 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 10 ऑगस्ट 2017

नंदुरबार - येथील शाळकरी विद्यार्थ्याच्या खून प्रकरणातील दोघा संशयित अल्पवयीन मुलांना लपवून ठेवल्याने त्यांचा पित्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात एका मुलाचे वडील जिल्हा परिषदेच्या सभापतीचा आहेत. 

येथील डी. आर. विद्यालयाचा विद्यार्थी राज ठाकरे याचा 19 जुलैला खून झाला. तो शाळेत गेला असता, त्याच्या दोघा मित्रांनी त्याला बोलावून नेले. मामाचा अपघात झाला आहे,असे सांगत मोटारसायकलने खामगाव शिवारात नेले. या ठिकाणी गळा चिरून खून केला. तपासाअंती दोघा अल्पवयीन मुलांविरुध्द खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. 

दरम्यान दोघा मुलांना बाल न्यायालयात हजर करण्यात आले असता, दोघांची जामिनावर मुक्तता करण्यात आली. न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात जनमत गेले. मात्र हा प्रकार न्यायालयाच्या अखत्यारीतील असल्याने त्यावर भाष्य करता येत नव्हते. दरम्यान जनमत लक्षात घेत पोलिसांनी या दोघा मुलांचा जामीन रद्द व्हावा, यासाठी जिल्हा न्यायालयात अपील दाखल केले. त्यावर जिल्हा न्यायाधीशांनी दोघा मुलांचा जामीन रद्द केला. पर्यायाने दोघा मुलांना धुळे येथील बालसुधारगृहात दाखल करणे आवश्‍यक होते. 

जामिनावर सुटली असल्याने ही मुले पालकांच्या ताब्यात होती. पोलिसांनी बालसुधारगृहात दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली. यावेळी दोघाही मुलांना त्यांच्या वडिलांनी अज्ञातस्थळी लपवून ठेवल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. यामुळे संशयित मुलांचे वडील जिल्हा परिषदेच्या बांधकाम व अर्थ समितीचे सभापती दत्तू भिला चौरे व दिलीप फत्तेसिंग गोसावी (दोघे रा. नंदुरबार) यांच्याविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशाप्रकारे गुन्हा दाखल होण्याची ही जिल्ह्यातील पहिली वेळ आहे.

Web Title: nandurbar news crime