Nandurbar News : पाणी साठवणुकीमुळे नवापूर तालुका टँकरमुक्त

Nandurbar News : पाण्याचे नियोजन, लोकप्रतिनिधींनी मतदारसंघात केलेली पाणी साठवणुकीबाबतची भूमिका यामुळे भर उन्हातही तालुका टँकरमुक्त आहे.
water
water esakal

नवापूर : तालुक्यातील भूजल पातळी व पाणी साठवणीबाबत वेळोवेळी घेतलेली काळजी, पाण्याचे नियोजन, लोकप्रतिनिधींनी मतदारसंघात केलेली पाणी साठवणुकीबाबतची भूमिका यामुळे भर उन्हातही तालुका टँकरमुक्त आहे. ही बाब तालुक्यासाठी भूषणावह आहे. मात्र ही परिस्थिती कायम राहण्यासाठी पावसाचे वाहून जाणारे पाणी. (Nandurbar News Navapur taluka tanker free due to water storage)

शेतातले पाणी शेततळ्यात अडवा व जिरवा, तर छतावरील पाणी विहीर अथवा बोअर, विंधन विहिरीत टाकून भूजल पातळी वाढवावी लागणार आहे. ‘पाणी अडवा पाणी जिरवा’ ही मोहीम कटाक्षाने राबवावी लागणार आहे, तरच तालुका टँकरमुक्त राहू शकेल. तालुक्यातील पाणी परिस्थिती इतर तालुक्यांच्या मानाने चांगली आहे. तालुक्यात पाण्यासाठी टँकर लावण्याची अद्याप वेळ आलेली नाही.

नवापूर तालुक्यातील कुठल्याही गावपाड्याने पाणी टँकरची मागणी केलेली नाही. उन्हाची तीव्रता आता मोठ्या प्रमाणात जाणवू लागली आहे. दर वर्षी उन्हाळ्यात तालुक्यातील ठराविक गावांना पाणीटंचाईची समस्या भेडसावते. महिला वर्गावर हंडाभर पाण्यासाठी रानोमाळ भटकंती करण्याची वेळ येते. हे चित्र ठिकठिकाणी पाहावयास मिळते. धरण उशाला आणि कोरड घशाला अशी गत गावोगावी दिसते. मात्र याबाबत नवापूर तालुका अद्यापही अपवाद आहे.

नवापूर तालुक्यातील पाणीपुरवठा करणाऱ्या योजनांची व पाण्याचा पुरवठा करणाऱ्या विहिरींची अवस्था बऱ्यापैकी आहे. पावसाचे पाणी सरळ विहिरीत सोडल्याने पाणीपातळी लवकर कमी होत नाही. जलजीवन मिशनअंतर्गत तालुक्यात ३१६ योजना मंजूर असून, त्यांपैकी २६० योजना प्रगतिपथावर आहेत, तर ५६ योजना ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने रद्द करण्यासाठी प्रस्तावित केल्या असून. (latest marathi news)

water
Nandurbar Lok Sabha Constituency : कॉंग्रेस -भाजपमध्येच 45 वर्षापासून रंगतेय सरळ लढत

संबंधित मक्तेदार यांचे नाव काळ्या यादीत टाकण्याबाबत शिफारस केली आहे. जिल्ह्यातील सर्वांत जास्त नवापूर तालुक्यात ५६ कामे रद्द करून मक्तेदारांना निविदेतील अटी-शर्तीनुसार कार्यवाहीसाठी प्रस्तावित करण्यात आले आहे. रद्द करण्यात आलेली कामे ही नवीन ई-टेंडरिंग कामे देण्यात येतील. ३१६ योजनांपैकी ज्या योजनेचा टप्पा एक पूर्ण झाला आहे त्या गावांना आपण पाणीपुरवठा सुरळीत सुरू केला आहे.

पाणीटंचाईबाबत वेळोवेळी आढावा

तालुक्यात आवश्यकतेनुसार लघुसिंचन प्रकल्प, मध्यम सिंचन प्रकल्प, पाटबंधारे, बांध, तलाव, शेततळे यांची पूर्तता केलेली आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी वेळोवेळी पाणीटंचाईबाबत आढावा घेत असून, पाणीटंचाई दूर करण्यासाठी नेहमी प्रयत्नशील असतात.

"पाणीटंचाईबाबत ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडे आतापर्यंत ३६ गावांनी व पाड्यांनी टंचाई ठराव दिले आहेत. त्याबाबत पंचायत समितीच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने प्रपत्र ‘अ’ भूजल विभागाकडे पाठवून दिले आहे. भूजल विभागाने सर्व्हे करून प्रपत्र ‘ब’ही दिले आहे व ते मान्यतेसाठी प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयात पाठविण्यात आला आहे. ३६ पैकी २३ गाव, पाडे यांना विंधन विहीर मंजूर करण्यात आली आहे. पाच पाड्यांना विंधन विहीर अधिग्रहण मंजूर करण्यात आले आहे."-अजय पाटील उपअभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, पंचायत समिती, नवापूर

water
Nandurbar Traffic Problem : मोलगीतील वाहतूक कोंडी सुटणार कधी? ग्रामस्थांची नाराजी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com