नंदुरबार शहर परिसरात पहिल्यांदाच पाऊस 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 24 जून 2017

नंदुरबार - नंदुरबार शहरासह परिसरात आज पहिल्यांदाच पाऊस झाला. सुमारे एकतास झालेल्या या पावसामुळे शहर जलमय झाले होते. गेल्या महिनाभरापासून पाऊस हुलकावणी देत होता. त्यामुळे शेतकरी पावसाचा आगमनाने आनंदित झाला आहे. 

नंदुरबार - नंदुरबार शहरासह परिसरात आज पहिल्यांदाच पाऊस झाला. सुमारे एकतास झालेल्या या पावसामुळे शहर जलमय झाले होते. गेल्या महिनाभरापासून पाऊस हुलकावणी देत होता. त्यामुळे शेतकरी पावसाचा आगमनाने आनंदित झाला आहे. 

मृग नक्षत्रात जिल्ह्यातील काही भागात जोरदार पाऊस झाला. मात्र नंदुरबार शहर व परिसरातील दहा किलोमीटर पट्टा वगळला होता. या परिसरात पावसाचे वातावरण निर्मिती होत होती. मात्र पाऊस हुलकावण्या देत होता. त्यामुळे शेतकरी चिंतातूर झाला होता. खरीपपूर्व मशागतीचे कामे उरकवून शेतकरी पेरणीसाठी सज्ज झाला आहे. मात्र पाऊसच नसल्याने त्यांचे डोळे आकाशाकडे लागले होते. मात्र आकाश भरून येत होते. वातावरण ढगाळ होऊन उन -सावल्यांचा खेळ सुरू होता. मात्र प्रत्यक्षात पाऊसच पडत नसल्याने साऱ्यांनाच चिंता लागली होती. आज सकाळी सहाच्या सुमारास पाऊस झाला. थोडावेळ अंगण शिंपडण्यासारख्या सरी कोसळल्या. परत बंद झाला. त्यानंतर पुन्हा नागरिकांनी आस सोडली होती. मात्र त्यानंतर तीन तासांनी म्हणजे नऊच्या सुमारास पावसाला जोरदार सुरुवात झाली. जवळपास अक तास पाऊस झाला. त्यामुळे सर्वत्र जलमय वातावरण झाले. काहीवेळ शहरातील वर्दळ मंदावली होती. शाळकरी मुलांची फजिती झाली. या पावसामुळे शेतकऱ्यांसह शहरातील नागरिकांमध्ये चैतन्य निर्माण केले आहे. एवढ्याच पावसावर भागणार नाही. तर शेतकऱ्यांना पेरण्यांसाठी अजूनही दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे.

Web Title: nandurbar news rain

टॅग्स