Nandurbar Unseasonal Rain : तळोद्यात वळिवाच्या पावसाची हजेरी; झाडे उन्मळून पडली, घरांचेही नुकसान

Unseasonal Rain : दोन दिवस हुलकावणी देणारा वळिवाचा पाऊस शेवटी तळोदा शहरात कोसळलाच. बुधवारी सायंकाळी चारपासून पावसाची वातावरणनिर्मिती झाली होती.
A tree lying near the entrance of Upazila Hospital. The second photo shows a roof blown down near a mosque in the city.
A tree lying near the entrance of Upazila Hospital. The second photo shows a roof blown down near a mosque in the city.esakal

Nandurbar Unseasonal Rain : दोन दिवस हुलकावणी देणारा वळिवाचा पाऊस शेवटी तळोदा शहरात कोसळलाच. बुधवारी सायंकाळी चारपासून पावसाची वातावरणनिर्मिती झाली होती. शेवटी विजांच्या कडकडाटासह शहर व तालुक्यात पावसाने हजेरी लावली. दुसरीकडे शहरात ठिकठिकाणी झाडे तुटून पडल्याने वाहतूक बंद पडली, तर घरांचे नुकसान झाले. त्यात उपजिल्हा रुग्णालयात झाड पडल्याने रस्ताच बंद झाला, तर तहसील रोडवर झाड पडल्याने घरांचे नुकसान झाले. (Nandurbar Presence of torrential rain in Taloda )

कुंभारवाड्यात झाड पडल्याने घराचे नुकसान झाले, तर रेखा सूर्यवंशी यांच्या घराचे पत्रे उडाले. शहरातील मशिदीजवळील घराचे छतच उडून खाली कोसळले. सुदैवाने त्या वेळी कोणीच नसल्याने जीवितहानी झाली नाही. दोन दिवसांपासून वादळी वाऱ्यासह केवळ मेघगर्जना करणाऱ्या अवकाळी पावसाने तळोदा शहरात हजेरी लावली आहे. सायंकाळी साडेपाचच्या सुमारास पावसाने जोरदार हजेरी लावली. (latest marathi news)

A tree lying near the entrance of Upazila Hospital. The second photo shows a roof blown down near a mosque in the city.
Nashik Unseasonal Rain : मध्यरात्री पावसाची जोरदार हजेरी; कमाल तापमानात 4 अंशांची वाढ

यात बस स्टँड रोडवरील अनेक दुकानदारांचे नुकसान झाले असून, अनेकांची तारांबळ उडाली. वीजतारा तुटल्याने वीजपुरवठादेखील खंडित झाला होता. त्यामुळे उन्हाळ्यात पावसाळी वातावरणाचा फील शहरवासीयांना आला. दुसरीकडे सध्या तळोद्यात कालिकामातेचा यात्रोत्सव भारत ऑइल मिल परिसरात सुरू आहे. व्यापाऱ्यांनी मोठा खर्च करून मोठमोठी दुकाने लावली आहेत.

असे असताना पावसाने व्यापाऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असून, खर्चदेखील भरून निघणार नसल्याची परिस्थिती आहे. आधीच महागाई वाढल्याने खरेदीदार कमी येत असताना व्यापाऱ्यांना यात्रेसाठी येण्या-जाण्याचा खर्चदेखील निघणार नसल्याचे बोलले जात आहे. त्यात पावसाने हजेरी लावल्याने कालिकामाता यात्रोत्सवात पावसाची हजेरी डोकेदुखी झाली आहे. त्यामुळे पावसाळी वातावरणाने हवेत गारवा निर्माण केला असला तरी शहरवासीयांसोबत यात्रेकरूंची व व्यापाऱ्यांची मात्र तारांबळ उडविली आहे.

A tree lying near the entrance of Upazila Hospital. The second photo shows a roof blown down near a mosque in the city.
Nandurbar Unseasonal Rain Damage : शहादा तालुक्यातील नुकसानग्रस्तांच्या बांधावर पोहचल्या डॉ. हिना गावित

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com