Nandurbar News : पहिल्याच दिवशी गावित-पाडवी परिवारातून 24 उमेदवारी अर्ज खरेदी

Nandurbar News : नंदुरबार लोकसभेसाठी आजपासून निवडणूक प्रक्रियेस प्रारंभ झाला असून, पहिल्याच दिवशी नऊ जणांनी उमेदवारी अर्ज खरेदी केले आहेत.
Application
Applicationesakal

Nandurbar News : नंदुरबार लोकसभेसाठी आजपासून निवडणूक प्रक्रियेस प्रारंभ झाला असून, पहिल्याच दिवशी नऊ जणांनी उमेदवारी अर्ज खरेदी केले आहेत. त्यात डॉ. हीना विजयकुमार गावित, डॉ. सुप्रिया विजयकुमार गावित. (Nandurbar Purchase of 24 nomination form from Gavit and Padvi family on first day)

डॉ. विजयकुमार कृष्णराव गावित यांनी भाजपकडून तीन, तर ॲड. के. सी. पाडवी, ॲड. गोवाल पाडवी, हेमलता के. पाडवी असे तीन अर्ज पाडवी कुटुंबीयांनी काँग्रेसकडून खरेदी केले आहेत.

तसेच पीपल्स पार्टी ऑफ इंडियाकडून श्रीमती निर्मला कागडा वसावे, तर सुशीलकुमार जहागीर पावरा आणि गोपाल सुरेश भंडारी या दोघांनी अपक्ष म्हणून अर्ज खरेदी केले. (latest marathi news)

Application
Nandurbar Agriculture Scheme : आता वनहक्कधारकांनाही विविध कृषी योजनांचा लाभ

डॉ. गावित कुटुंबीयांनी १२ व ॲड. पाडवी कुटुंबीयांनी प्रत्येकी १२ म्हणजे प्रत्येकी चार उमेदवारी अर्ज घेतले. अपक्षांनी सहा अर्ज घेतले, असे एकूण ३० अर्ज पहिल्याच दिवशी विक्री झाले.

Application
Nandurbar Lok Sabha Constituency : लोकसभेच्या रणधुमाळीत स्थानिक प्रश्नांची केवळ चर्चाच!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com