Nandurbar News : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिस दलातर्फे नंदुरबारात रूट मार्च

Nandurbar : समाजकंटकांवर व गुन्हेगारांवर वचक राहून निवडणुका भयमुक्त वातावरणात पार पडाव्यात याकरिता नुकताच जिल्हा पोलिस दलातर्फे शहरात रूट मार्च काढण्यात आला.
Collector Manisha Khatri, Superintendent of Police Shravan Dutt participated in the route march organized by the district police force.
Collector Manisha Khatri, Superintendent of Police Shravan Dutt participated in the route march organized by the district police force. esakal

Nandurbar News : आगामी लोकसभा निवडणूक-२०२४ च्या अनुषंगाने नंदुरबार जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, तसेच समाजकंटकांवर व गुन्हेगारांवर वचक राहून निवडणुका भयमुक्त वातावरणात पार पडाव्यात याकरिता नुकताच जिल्हा पोलिस दलातर्फे शहरात रूट मार्च काढण्यात आला.

रूट मार्चच्या वेळी जिल्हाधिकारी मनीषा खत्री व पोलिस अधीक्षक श्रवण दत्त एस., अपर पोलिस अधीक्षक नीलेश तांबे. (Nandurbar Route march in Nandurbar by police force in view of Lok Sabha elections)

नंदुरबार विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी संजय महाजन, शहादा विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी दत्ता पवार, अक्कलकुवा विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी सदाशिव वाघमारे व सीमा सुरक्षा दल (बीएसएफ) यांच्यासह एकूण २५६ पोलिस अधिकारी व अंमलदार उपस्थित होते.

रूटमार्च नंदुरबार शहर पोलिस ठाण्यातून निघून पंडित जवाहरलाल नेहरू चौक, महात्मा गांधी चौक, हाट दरवाजा. (latest marathi news)

Collector Manisha Khatri, Superintendent of Police Shravan Dutt participated in the route march organized by the district police force.
Nandurbar News : काँग्रेस रामाचा पुजारी, तर भाजप रामाचा व्यापारी : जयराम रमेश

महाराष्ट्र व्यायामशाळा, अली साहेब मोहल्ला, कसाई मोहल्ला, महात्मा जोतिराव फुले पुतळा, चिराग गल्ली,

ईलाही चौक, सुतार मोहल्ला, फडके चौकी, सोनार गल्ली, जळका बाजार, बागवान गल्ली, दो शाह तकिया, सिद्धिविनायक मंदिर, मंगळ बाजार, पालिका या तीन ते चार किलोमीटरच्या मार्गाने मार्गक्रमण करून व पुन्हा पंडित जवाहरलाल नेहरू चौकात रूटमार्च समाप्त झाला. आगामी लोकसभा निवडणूक-२०२४ साठी नंदुरबार जिल्हा प्रशासन व पोलिस दल सज्ज आहे.

Collector Manisha Khatri, Superintendent of Police Shravan Dutt participated in the route march organized by the district police force.
Nandurbar News : तळोद्यात ऐन उन्हाळ्यातील हालामुळे नागरिकांची नाराजी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com