Nandurbar News : चांदसैली घाटात दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प; सुदैवाने जीवित हानी नाही

Nandurbar : तळोदा ते धडगाव दरम्यानच्या चांदसैली घाटात शुक्रवारी (ता.७) दरड कोसळल्यामुळे रस्ता वाहतुकीसाठी बंद झाला.
Landslides and stones spread on the road in Chandsaili Ghat due to a landslide.
Landslides and stones spread on the road in Chandsaili Ghat due to a landslide.esakal

Nandurbar News : तळोदा ते धडगाव दरम्यानच्या चांदसैली घाटात शुक्रवारी (ता.७) दरड कोसळल्यामुळे रस्ता वाहतुकीसाठी बंद झाला. त्यामुळे वाहनधारकांना विशेषतः नोकरदारांना मनस्ताप सहन करावा लागला. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. तळोदा शहरासह तालुक्यात ठिकठिकाणी शुक्रवारी (ता.७) पावसाने हजेरी लावली. सातपुड्याच्या पट्टयातही चांगला पाऊस झाला. पावसामुळे शुक्रवारी मध्यरात्री चांदसैली घाटातील रस्त्यालगत दरड कोसळली. (Traffic stopped due to landslide in Chandsaili Ghat )

यामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात दगड, मातीचा ढिगारा पसरून दोन्ही बाजूने वाहतूक ठप्प झाली. काही वाहनधारक व परिसरातील नागरिकांनी रस्त्यावरील दगड, माती बाजूला करण्याचा प्रयत्न केला, मात्र रस्ता पूर्णपणे मोकळा होऊ न शकल्याने रस्ता वाहतुकीसाठी बंद झाला. त्यामुळे नोकरी, व्यवसायानिमित्त ये-जा करणाऱ्या असंख्य नागरिकांना तसेच वाहतुकदारांना अर्ध्या रस्त्यातून परतावे लागून त्यांना मनस्ताप सहन करावा लागला.

चांदसैली घाट सातपुड्याच्या दुर्गम, अतिदुर्गम भागाला जिल्हा मुख्यालयाशी जोडणारा सर्वात कमी अंतराचा मार्ग आहे. त्यामुळे बहुसंख्य नागरिक वेळ, श्रम, इंधनाची बचत व्हावी या हेतूने चांदसैली घाटामार्गाचा मोठ्या प्रमाणात वापर करतात. मात्र चांदसैली घाटात दरवर्षी पावसाळ्यात दरडी कोसळण्याचा घटना घडतात. त्यामुळे या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढावा, अशी अपेक्षा वाहनधारकांनी व्यक्त केली. (latest marathi news)

Landslides and stones spread on the road in Chandsaili Ghat due to a landslide.
Nandurbar News : मातीची घरे कालबाह्य होण्याच्या मार्गावर; सिमेंटच्या जंगलाचा परिणाम

संरक्षक जाळी बसवावी

चांदसैली घाटात मोठ्या प्रमाणावर वळणे, खोल दरी, अरुंद रस्ता असल्याने वाहन चालविताना वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागते. त्यातच पावसाळ्यात वारंवार कोसळणाऱ्या दरडींमुळे नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागते. त्यामुळे संबंधित बांधकाम विभागाने घाटात सर्वेक्षण करीत आवश्यक त्या ठिकाणी संरक्षक जाळी बसवावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

फक्त ठेकेदार पोसले जातात

चांदसैली घाटात दरवर्षी पावसाळ्यात दरडी कोसळण्याचा घटना घडतात आणि त्यामुळे अनेकदा रस्ता वाहतुकीसाठी बंद होतो. संबंधित विभाग मात्र दरवर्षी फक्त थातुरमातूर उपाययोजना करतात आणि वेळ मारून नेतात. आणि त्यामुळे समस्या कायमस्वरूपी मार्गी लागत नाही. उलट यातून फक्त ठेकेदारच पोसले जात असल्याचा आरोप होत आहे.

दगडांची पकड कमकुवत

दरम्यान या परिसरात विजेचे टॉवर बसविण्यात आले होते. त्यासाठी ब्लास्टिंग करून डोंगराचे दगड फोडल्याचे सांगितले जाते. त्यामुळे दगडांची पकड कमकुवत झाल्याने कदाचित त्यामुळेच पावसाळ्यात सातत्याने दरडी कोसळण्याचा घटना घडत असाव्यात, असे बोलले जात आहे.

Landslides and stones spread on the road in Chandsaili Ghat due to a landslide.
Nandurbar News : या चिमण्यांनो परत फिरा रे..! ग्रामीण भागातील चिवचिवाट लुप्त

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com