‘मुख्य आरोपीला अद्याप अटक का होत नाही?’

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 21 ऑगस्ट 2018

नाशिक - डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणातील मुख्य आरोपीला पाच वर्षे झाली, तरीही अद्याप अटक का होत नाही, असा प्रश्‍न उपस्थित करून जेएनयू विद्यार्थी संघाचा माजी अध्यक्ष कन्हय्याकुमार याने आज येथे सीबीआय, एटीएस या स्वायत्त संस्थांचा सरकार दुरुपयोग करत असल्याचा आरोप केला.

देशातील नाव कमावलेल्या तपास यंत्रणांबद्दल प्रश्‍न नाही, असे स्पष्टीकरण देत या यंत्रणांना भाजपचे अध्यक्ष अमित शहा हे काम करू देत नाहीत, असाही आरोप त्याने केला.

पत्रकारांशी बोलताना कन्हय्याकुमार म्हणाला, की सत्तेविरुद्ध संघर्ष केला जाऊ नये म्हणून भीतीचे वातावरण तयार केले जात आहे. धर्म आणि आस्थेबद्दल तर्क असत नाही. तर्कावर विचार सुरू केल्यावर भीती दाखविण्यात येते.

Web Title: Narendra Dabholkar Murder Case Why is not the main accused arrested