नाशिकचे अल्बम साँग टी-सिरीजवर

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 5 जून 2019

प्रेमात पडल्यावर सगळीकडे तीच दिसू लागते, तिच्याच स्वप्नात रमायला आवडते आणि मन प्रेमाचे गाणे गुणगुणते, असेच एक स्वप्न सत्यात उतरविण्यात नाशिकचे तरुण यशस्वी झाले आहेत. सध्या अनेक टेलिव्हिजन वाहिन्यांवर मराठी अल्बम सांग पाहायला मिळतात. पण, त्यातली काहीच गाणी रसिकांच्या पसंतीस पात्र ठरतात, संगीत क्षेत्रात देशातील नामवंत कंपनी टी-सिरीजने नाशिकच्या ‘स्वप्नात तू’ या गाण्याची निवड केली तेव्हा कष्टाला फळ मिळाल्याचा आनंद ‘स्वप्नात तू’च्या टीमने ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केला.

नाशिक - प्रेमात पडल्यावर सगळीकडे तीच दिसू लागते, तिच्याच स्वप्नात रमायला आवडते आणि मन प्रेमाचे गाणे गुणगुणते, असेच एक स्वप्न सत्यात उतरविण्यात नाशिकचे तरुण यशस्वी झाले आहेत. सध्या अनेक टेलिव्हिजन वाहिन्यांवर मराठी अल्बम सांग पाहायला मिळतात. पण, त्यातली काहीच गाणी रसिकांच्या पसंतीस पात्र ठरतात, संगीत क्षेत्रात देशातील नामवंत कंपनी टी-सिरीजने नाशिकच्या ‘स्वप्नात तू’ या गाण्याची निवड केली तेव्हा कष्टाला फळ मिळाल्याचा आनंद ‘स्वप्नात तू’च्या टीमने ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केला. 

सलग दोन दिवस या गाण्याचे शूटिंग नाशिकच्या स्वराज हॉटेल व त्र्यंबकेश्‍वर परिसरात सुरू होते. अरमान फिल्म्स व एम.डी.आर. ॲन्ड सन्स फिल्म्स प्रस्तुत स्वप्नात तू या गाण्यात चित्रपट क्षेत्रात पाऊल ठेवणारा अभिनेता फैज शेख आणि नाशिकची अभिनेत्री वर्षाराणी पटेल यांच्यावर हे गाणे चित्रित करण्यात आले आहे. गाण्याचे संगीत संयोजन गौरव आशिष या प्रसिद्ध जोडीने केले असून, गायिका अमृता खोडके, गौरव शिंदे, आशिष शुक्‍ल यांच्या आवाजात हे गाणे रेकॉर्ड करण्यात आले आहे. दिग्दर्शन विशाल दवंगे यांचे असून, ताहीरभाई शेख व पार्थसारथी राजेंद्र चव्हाण यांनी निर्मित केलेले आहे.

या गाण्याचे सहाय्यक दिग्दर्शक सचिन आर. जाधव, छायांकन गणेश चांदवडकर, संकलन व्ही.एफ.एक्‍स. वेदांत सौंदाणकर, रंगभूषा नूतन मिस्त्री, निर्मिती व्यवस्थापक सागर येलमामे, कलात्मक अभिनय इंद्रजित पवार, प्रॉडक्‍शन गुलाम शेख, योगेश भांडगे यांच्या अथक परिश्रमातून या गाण्याची निर्मिती झालेली आहे.

आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून तयार करण्यात आलेल्या ‘एक क्षण प्रेमाचा’ या आगामी लघुपटात समाविष्ट केलेले स्वप्नात तू हे गाणे लवकरच टी-सिरीज या नामवंत कंपनीच्या फ्लॅटफॉर्मवर रसिकांच्या भेटीला येत असून, आगामी अल्बम साँगचे चित्रीकरण नुकतेच हिमाचल प्रदेशातील निसर्गरम्य ठिकाण मनाली येथे करण्यात आल्याचे टीमकडून सांगण्यात आले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nashik Album Swapnat Tu Song on T Series Varsharani Patel