छगन भुजबळ हे उद्या नाशिक-येवल्यात कार्यकर्त्यांना भेटणार

Residential Photo
Residential Photo

नाशिक ः कॅबीनेट मंत्री झाल्यानंतर छगन भुजबळ हे पहिल्यांदा नाशिकमध्ये दाखल झाले आहेत. ते उद्या (ता. 9) नाशिक आणि येवल्यातील कार्यकर्त्यांना भेटणार आहेत. तसेच माजी राज्यमंत्री तुकाराम दिघोळे आणि माजी आमदार सूर्यभान गडाख यांच्या निधनामुळे त्यांच्या कुटुंबियांचे निवासस्थानी जाऊन सांत्वन करतील. 
मुंबईहून श्री. भुजबळ रात्री नाशिकमध्ये मुक्कामी पोचले आहेत. उद्या सकाळी दहापासून सायंकाळी चारपर्यंत भुजबळ फार्म येथे ते कार्यकर्त्यांना भेटतील. त्यानंतर सव्वाचारला दिघोळे, तर पावणेपाचला गडाख कुटुंबियांचे सांत्वन करतील. सायंकाळी साडेसहाला येवल्यात पोचल्यावर ते संपर्क कार्यालयात कार्यकर्त्यांना भेटणार आहेत. उद्या त्यांचा मुक्काम येवल्यात असेल. मंगळवारी (ता. 10) सकाळी दहापासून दुपारी दोनपर्यंत येवल्यातील संपर्क कार्यालयात पुन्हा कार्यकर्त्यांना भेटतील आणि त्यानंतर ते मुंबईकडे मोटारीने प्रयाण करतील.

प्रलंबित प्रश्नांसाठी तक्रारदारांची रीघ अपेक्षित

नाशिककरांबरोबर येवलाकरांचे अनेक प्रश्न खोळंबले आहेत. त्यामध्ये शेतीपासून विकासाच्या विविध बाबींचा समावेश आहे. त्यामुळे यासंबंधीची गाऱहाणी मांडण्यासाठी तक्रारदारांची रीघ श्री. भुजबळ यांच्या भेटीसाठी लागण्याची शक्यता अधिक आहे. त्याचबरोबर राज्यातील सत्तांतरामध्ये महत्वाची भूमिका बजावली असल्याने त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करण्यासाठी कार्यकर्त्यांमध्ये मोठी उत्सुकता आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com