नाशिकचे चेतन अग्निहोत्री आयर्न मॅन

nashik
nashik

नाशिक - आयोध्यानगर, उपनगर येथे राहणारे चेतन अग्निहोत्री हे मलेशिया येथे आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धेचे आयर्न मॅन ठरले आहेत.

ही स्पर्धा जिंकण्यासाठी चेतन यांनी 180 km  सायकलिंग, 4 km समुद्रातून पोहणे व 42 km धावणे केवळ 15 तासात पुर्ण केले. अतिशय कठीण अशी ही स्पर्धा जिंकण्यासाठी चेतन यांनी खूप मेहनत घेतली. आपल्या यशाचे श्रेय चेतन यांनी आपल्या पत्नी, आई वडिल तसेच आपल्या भावाला व आपल्या दोन्ही मुलींना दिले आहे. या सर्वांनी चेतन यांना खूप प्रोत्साहित करत महत्वपूर्ण अशी साथ दिली.

नाशिकचे पोलिस कमिशनर रवींद्रकुमार सिंघल यांच्यानंतर नाशिकमध्ये आयर्न मॅन हा किताब जिंकणारे चेतन अग्निहोत्री हे पहिले ठरले आहे. विशेष म्हणजे सर्वसामान्य कुटुंबातील असणारे चेतन अग्निहोत्री यांनी नोकरी व घर सांभाळून मेहनत करत ही कामगिरी केली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com