नाशिक-दिल्लीदरम्यान विमानसेवेला सुरवात

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 16 जून 2018

नाशिक - होणार... होणार... होणार... अशा केवळ चर्चेत असलेल्या नाशिक-दिल्ली हवाई सेवेला आज अखेर सुरवात झाली. दुपारी अडीच वाजता दिल्लीहून ओझर विमानतळाच्या धावपट्टीवर उतरलेल्या विमानाने नाशिककरांची खऱ्या अर्थाने स्वप्नपूर्ती झाली. पहिल्याच दिवशी दिल्लीहून 126, तर नाशिकहून दिल्लीला 120 प्रवासी पोचले.

विशेष म्हणजे जेटच्या कार्गोसेवेलाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळताना तीन टन केसरी आंबे लंडन, तर एक टन हिरवी मिरची दुबईच्या बाजारपेठेकडे रवाना झाली.

हवाई सेवेच्या उद्‌घाटन प्रसंगी जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन यांनी पायाभूत सुविधा पुरविण्याचे तर जेट एअरवेजचे वरिष्ठ उपाध्यक्ष राज शिवकुमार यांनी निरंतर सेवा सुरू ठेवण्याचे आश्‍वासन दिले. केंद्र सरकारने उडान योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात जेट एअरवेजतर्फे ही दिल्ली-नाशिक हवाई सेवा सुरू केली आहे.

जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन म्हणाले, की विमानेसेवेमुळे उत्तर महाराष्ट्राला राजधानी दिल्लीत तत्काळ पोचण्याची सुविधा निर्माण झाली आहे. विमानतळावर कॅफेटोरिया, मनोरंजन, रिफ्रेशमेंट, प्रिपेड टॅक्‍सी आदी सेवा पुरविल्या जातील.

- जेट एअरवेजचे 168 सीटरचे विमान.
- 12 आसने विशेष श्रेणीसाठी, तर 156 सर्वसाधारण.
- आठवड्यातील सोमवार, बुधवार व शुक्रवार सेवा.
- दिल्ली येथून दुपारी बाराला, तर ओझरहून दोन वाजून 35 मिनिटांनी उड्डाण.
- हैदराबाद, बंगळूर, अहमदाबाद, गोवा, भोपाळ या शहरांशी तत्काळ कनेक्‍टिव्हिटी.

Web Title: nashik delhi plane service