Dhule Lok Sabha Constituency : नाशिकला एकदाच उमेदवारीची संधी; लोकसभा मतदारसंघात 67 वर्षे धुळ्याचाच वरचष्मा

Dhule News : लोकसभेच्या धुळे मतदारसंघातील पंचवार्षिक निवडणुकीत नाशिक जिल्ह्याला केवळ एकदाच उमेदवारीची संधी मिळाली आहे. उर्वरित ६७ वर्षांत धुळे जिल्ह्याचाच वरचष्मा राहिला आहे.
Dhule Lok Sabha Constituency
Dhule Lok Sabha Constituency esakal

Dhule News : लोकसभेच्या धुळे मतदारसंघातील पंचवार्षिक निवडणुकीत नाशिक जिल्ह्याला केवळ एकदाच उमेदवारीची संधी मिळाली आहे. उर्वरित ६७ वर्षांत धुळे जिल्ह्याचाच वरचष्मा राहिला आहे. काँग्रेसच्या उमेदवारीबाबत यंदा नाशिक जिल्ह्याकडे वारे वाहात आहेत. त्यामुळे नेमकी उमेदवारीची संधी यंदा नाशिक आणि धुळे जिल्ह्यापैकी कुणाच्या पदरात पडते याविषयी उत्कंठा शिगेला पोहोचली आहे, तर उमेदवारीत भाजपने पुन्हा धुळ्याला प्रतिनिधीत्त्वाची संधी दिली आहे. (Dhule Lok Sabha Constituency)

लोकसभा मतदारसंघाच्या फेरपुनर्रचनेनंतर २००९ पासून धुळे मतदारसंघ सर्वसाधरण संवर्गासाठी खुला झाला. तत्पूर्वी, तो १९५२ पासून सर्वसाधारण संवर्ग, तर १९८० पासून अनुसूचीत जमातीसाठी राखीव होता. स्वातंत्र्यानंतर धुळे लोकसभा मतदारसंघ हा पश्चिम खानदेश सर्वसाधारण मतदारसंघ म्हणून प्रचलित होता. तो जळगाव जिल्ह्यातील एरंडोलकडे जोडलेला होता.

मतदारसंघात बदल

कालांतराने पुनर्रचनेनंतर हा मतदारसंघ अनुसूचीत जमातीसाठी राखीव झाला. त्यात कळवण, बागलाण (जि. नाशिक), धुळे, साक्री, शिंदखेडा, कुसुंबा (जि. धुळे), असे सहा विधानसभा मतदारसंघ जोडले गेले. पुन्हा २८ वर्षांनी मतदारसंघाची फेरपुनर्रचना झाली आणि २००९ पासून या मतदारसंघातील कळवण, साक्री हे दोन विधानसभा मतदारसंघ वगळले गेले, त्याऐवजी मालेगाव शहर आणि मालेगाव बाह्य (ग्रामीण) या दोन विधानसभा मतदारसंघाचा अंतर्भाव झाला.

धुळे जिल्ह्याचा वरचष्मा

लोकसभा निवडणुकीतील उमेदवारीत प्रथम १९५२ पासून २००९ पर्यंत तब्बल ५७ वर्षे धुळे शहर व तालुक्याचाच वरचष्मा राहिला आहे. देशात १९५२ च्या पहिल्या लोकसभा निवडणुकीत पश्चिम खानदेश सर्वसाधारण मतदारसंघातून धुळ्यातील काँग्रेसचे शालिग्राम रामचंद्र भारतीया विजयी झाले. (latest marathi news)

Dhule Lok Sabha Constituency
Dhule Lok Sabha Election : धुळे लोकसभेसाठी कॉंग्रेसतर्फे 2 नवीन नावांची चर्चा

पुढील पंचवार्षिक निवडणुकीत १९५७ ला धुळ्यातील उत्तमराव लक्ष्मणराव पाटील, १९६२ ते १९७१ धुळ्यातील चुडामण आनंदा पाटील, १९७७ ला नवलनगर (ता. धुळे) येथील विजय नवल पाटील यांनी खासदारकी मिळविली. पुढे १९८० पासून उमेदवारी साक्री तालुक्याकडे सरकली. त्यात २००९ पर्यंत तीन वेळा रेशमा मोतीराम भोये.

दोन वेळा बापू हरी चौरे, साहेबराव बागुल, डी. एस. अहिरे, रामदास रूपला गावित खासदार झाले. २००९ ला प्रताप सोनवणे (रा. सटाणा) यांच्या रूपाने नाशिक जिल्ह्याला प्रथमच उमेदवारीची संधी मिळाली. नंतर गेल्या दहा वर्षांपासून धुळे शहरातील डॉ. सुभाष भामरे हे मतदारसंघाचे प्रतिनिधीत्त्व करीत आहेत. या स्थितीचे अवलोकन केले असता ६७ वर्षे उमेदवारीची संधी धुळ्याकडे अबाधित राहिली आहे.

Dhule Lok Sabha Constituency
Dhule Water Scarcity : जिल्ह्यात टंचाई निवारणार्थ नियंत्रण कक्ष : जिल्हाधिकारी अभिनव गोयल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com