Dhule Water Scarcity : जिल्ह्यात टंचाई निवारणार्थ नियंत्रण कक्ष : जिल्हाधिकारी अभिनव गोयल

Dhule : जिल्ह्यात टंचाई निवारणासाठी नियंत्रण कक्ष स्थापन झाला असून, नागरिकांनी समस्या असल्यास ०२५६२-२८८०६६ या क्रमांकावर नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी केले.
Dhule Water Scarcity
Dhule Water Scarcity esakal

Dhule News : जिल्ह्यात टंचाई निवारणासाठी नियंत्रण कक्ष स्थापन झाला असून, नागरिकांनी समस्या असल्यास ०२५६२-२८८०६६ या क्रमांकावर नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी केले. जिल्हाधिकारी गोयल यांनी सांगितले, की जिल्ह्यात २०२३ च्या पावसाळ्यात एकूण ४३३.७ मिलिमीटर म्हणजे वार्षिक सरासरीच्या ८१.०५ टक्के पाऊस झाला आहे. (Dhule Collector Abhinav Goyal statement Control room for water shortage relief in district)

सद्यःस्थितीत जिल्ह्यातील मध्यम व लघु प्रकल्पांमध्ये १२२.३९ दलघमी (२५.१६ टक्के) जलसाठा शिल्लक आहे. गेल्या वर्षी आजच्या दिवशी १९८.८१ दलघमी (४०.८६ टक्के) जलसाठा शिल्लक होता. जिल्ह्यात पिण्याच्या पाण्यासाठी आजअखेर ८५ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले असून, शिंदखेडा तालुक्यातील डाबली, धावडे, रहीमपुरे व धुळे तालुक्यातील तिसगाव, वडेल येथे एकूण पाच शासकीय टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

दुष्काळी स्थिती जाहीर

जिल्ह्यात २०२३ मध्ये अत्यंत कमी पर्जन्यमान झाल्यामुळे ३१ ऑक्टोबर २०२३ च्या शासन निर्णयान्वये संपूर्ण शिंदखेडा तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. तसेच जिल्ह्यातील धुळे, साक्री, शिरपूर या तीन तालुक्यांतील एकूण २८ महसूल मंडळांत दुष्काळसदृश्य स्थिती जाहीर करण्यात आली आहे.

दुष्काळी स्थितीच्या अनुषंगाने तसेच पाणीटंचाई उपाययोजना करण्यासाठी जिल्ह्यातील मध्यम व लघु प्रकल्पातील पिण्यासाठी आरक्षित असलेल्या पाण्याचे आवर्तन सोडण्याकामी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली २९ मार्च व १ एप्रिल २०२४ ला सर्व जिल्हास्तरीय संबंधित विभागांची आढावा बैठक घेण्यात आली. (latest marathi news)

Dhule Water Scarcity
Dhule Water Scarcity : जिल्ह्यातील प्रकल्पांत अवघा 25 टक्के साठा; कडक उन्हामुळे जिवाची काहिली

गस्तीपथकाबाबत निर्देश

बैठकीत जिल्हाधिकारी गोयल यांनी जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारणार्थ अक्कलपाडा मध्यम प्रकल्पातून ५ एप्रिलला २५० दलघफू पाण्याचे आवर्तन सोडण्याबाबत निर्देश दिले आहेत. तसेच सद्यःस्थितीत ज्या धरणातील पाणी पिण्यासाठी आरक्षित असेल व आरक्षित पाण्यामधून अवैधरीत्या पाण्याचा उपसा थांबवून संबंधितांवर कायदेशीर कार्यवाही करण्यासाठी तहसीलदार.

ग्रामीण पाणीपुरवठा उपअभियंता, पाटबंधारे विभागातील अधिकारी, वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांचे संयुक्त गस्तीपथक नेमण्याबाबत निर्देश दिले आहेत. तसेच तालुकास्तरीय टंचाई निवारण समित्यांना नियमित बैठका घेण्याचे निर्देश दिल्याची माहिती जिल्हाधिकारी गोयल यांनी दिली.

जलजीवन मिशनला गती द्यावी

जिल्ह्यात सद्यःस्थितीत पाच शासकीय टँकर सुरू आहेत; परंतु भविष्यात टँकर लागण्याची शक्यता लक्षात घेऊन खासगी टँकरसाठी निविदाप्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. ज्या गावांमध्ये विहिरीचे अधिग्रहण करण्यात आले आहे व संभाव्य शक्यता आहे, अशा गावांमध्ये जलजीवन मिशनअंतर्गत कामे तातडीने पूर्ण करण्याची सूचना संबंधित यंत्रणेला दिल्याची माहिती जिल्हाधिकारी गोयल यांनी दिली.

Dhule Water Scarcity
Dhule Lok Sabha Election : धुळे लोकसभेसाठी कॉंग्रेसतर्फे 2 नवीन नावांची चर्चा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com