esakal | VIDEO : साहेब..बांधावर येऊन एकदा बघा तरी..व्यथित शेतकऱ्यांचे संजय राऊतांना आवाहन
sakal

बोलून बातमी शोधा

palse farmers.jpg

मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रात एकीकडे भाजप, शिवसेना आणि मित्रपक्षांच्या महायुतीमध्ये मोठया प्रमाणात सत्ता संघर्ष पेटलेला दिसतो आहे, तर दुसरीकडे संपुर्ण राज्यात परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांवर अस्मानी संकट कोसळलेले दिसते. तालुक्यातील जवळपास शंभराच्या आसपास गावे आहेत यात प्रामुख्याने द्राक्षे, सोयाबीन, तांबटे, कोथंबीर, भाजीपाला आदी पिकांचे नुकसान झाले आहे. एकाच वर्षी दुसऱ्यांदा नुकसानीचा फटका सोसावा लागला आहे, त्यामुळे शेतकरी वर्ग प्रचंड अस्वस्थ असून नुकसानीचा पंचनामा करावा ,अशी त्यांची मागणी आणि अपेक्षा आहे

VIDEO : साहेब..बांधावर येऊन एकदा बघा तरी..व्यथित शेतकऱ्यांचे संजय राऊतांना आवाहन

sakal_logo
By
उमेश देशमुख : सकाळ वृत्तसेवा

नाशिक : भाजप -शिवसेना महायुतीमध्ये सत्तेसाठी प्रचंड संघर्ष पेटला आहे. त्यांनी एकमेकांची उणेधुणे काढण्यात वेळ वाया घालू नये, त्यापेक्षा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या झालेल्या शेत पिकांच्या नुकसानीची पाहणी करावी, विशेष करून अलीकडच्या काळात शिवसेनेचे चाणक्य म्हणून उदयास आलेले खासदार संजय राऊत यांनी ही पाहणी करावी, असे आवाहन पळसे शिवारातील व्यथित शेतकऱ्यांने केले आहे.

खासदार राऊतच का ?

मागील काही दिवसांपासून संजय राऊत केवळ सत्तेची गणिते मांडण्यात व्यस्त दिसतात. टीव्ही चॅनेल्स देखील त्यांचाच चेहरा वारंवार दाखवतात. संजय राऊत आमच्या शेताच्या बांधावर आलेच तर किमान आमच्या समस्येकडे सर्वाचे लक्ष केंद्रित होईल त्यामुळे आमच्या पंचनाम्याचे काम मार्गी लागून नुकसान भरपाईचा मार्ग मोकळा होईल, असे लॉजिक शेतकरी वर्गाचे आहे.

गळकुज झाल्याने आर्थिक फटका

परतीच्या पावसामुळे द्राक्ष बागेतील फळांवर गळकुजची।संक्रात ओढवली आहे. एका झाडाला साठ ते सत्तर घडे असतात मात्र आता केवळ जेमतेम वीस ते पंचवीस घडे आहेत. यामुळे सरासरी सत्तर टक्के नुकसान द्राक्ष बागायत दाराणा सोसावे लागू शकते.

जुन्याच पंचनाम्यावर नुकसान भरपाई

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे नाशिक युवक तालुका अद्यक्ष गणेश गायधनी म्हणाले की, आम्ही नाशिक तालुक्यातील गावांच्या शेत पिकांचे पंचनामे करावे , अशी मागणी केली मात्र प्रशासनाचे अधिकारी म्हणतात आता वेळ नाही मागचेच पंचनामे ग्राह्य धरू असे उत्तर दिले जात आहे.शिवसेनेच्या चाणक्क्यांनी टीव्ही चॅनेल्स वर सत्ता समीकरनाच्या गप्पा मारण्यापेक्षा शेतकऱ्यांच्या बांदावर येऊन नुकसानीची पाहणी करायला हवी, असे गायधनी यांनी म्हटले

मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रात एकीकडे भाजप, शिवसेना आणि मित्रपक्षांच्या महायुतीमध्ये मोठया प्रमाणात सत्ता संघर्ष पेटलेला दिसतो आहे, तर दुसरीकडे संपुर्ण राज्यात परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांवर अस्मानी संकट कोसळलेले दिसते. तालुक्यातील जवळपास शंभराच्या आसपास गावे आहेत यात प्रामुख्याने द्राक्षे, सोयाबीन, तांबटे, कोथंबीर, भाजीपाला आदी पिकांचे नुकसान झाले आहे. एकाच वर्षी दुसऱ्यांदा नुकसानीचा फटका सोसावा लागला आहे, त्यामुळे शेतकरी वर्ग प्रचंड अस्वस्थ असून नुकसानीचा पंचनामा करावा ,अशी त्यांची मागणी आणि अपेक्षा आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून बहुमत असूनही सरकार अस्तित्वात आलेले नाही, सत्तेचा अधिक वाटा अन मुख्यमंत्री पदासाठी सर्वकाही पोरखेळ राज्यातील जनता पाहत आहे.

तर होईल तीव्र आंदोलन.. 

वेळीच पंचनामे झाले नाहीत तर आम्ही तीव्र आंदोलन छेद असा इशारा नाशिक तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष गणेश गायधनी, मनसे नाशिक तालुका उपाध्यक्ष सुनिल गायधनी, ज्ञानेश्वर गायधनी, गणपत गायधनी, सोमनाथ चौधरी, भारत चौधरी, भास्कर चौधरी , पांडुरंग गायधनी, संजय आगळे, संजय गवळी, ज्ञानेश्वर गायधनी, रमेश गायधनी, सुनिल गायधनी, संदिप गायखे, बाजीराव गोडसे, संपतराव गायधनी , संतोष गायधनी, नंदू गायधनी आदींनी दिला आहे.