नाशिक पदवीधरसाठी 24 उमेदवारांचे 39 अर्ज 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 18 जानेवारी 2017

नाशिक रोड - विधान परिषदेच्या नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठीच्या आजच्या शेवटच्या दिवसाखेरीपर्यंत 24 उमेदवांरानी 39 अर्ज दाखल केले आहेत. उद्या (ता. 18) उमेदवारी अर्जांची छाननी निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त एकनाथ डवले करणार आहेत. उमेदवारी अर्ज माघार घेण्याची मुदत शुक्रवारपर्यंत (ता. 20) आहे. 3 फेब्रुवारीला मतदान होणार असून, 6 फेब्रुवारीला मतमोजणी होईल. 

उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्यांची नावे अशी ः डॉ. सुधीर भास्कर तांबे (कॉंग्रेस), डॉ. प्रशांत वसंतराव पाटील (भारतीय जनता पक्ष), प्रकाश नरहर देसले (भारतीय कम्युनिस्ट पक्ष), सुभाष भाऊसाहेब डांगे (श्रीगोंदा), मनोज दामोदर पवार (मालेगाव), महेश कडूस (नगर), बापू रणधीर (नगर), संजय भीमराव सूर्यवंशी (जळगाव), विजय रघुनाथ गायकवाड (नगर), ऍड. संतोष कौतिक इंगळे (जळगाव), शरद मंगा तायडे (नाशिक रोड), नितीन नारायण सरोदे (नाशिक), ऍड. सचिन शिवाजी पठारे (पारनेर), बाळासाहेब धोंडिबा लांडे (नगर), विठ्ठलराव नेमूजी गुंजाळ (नगर), विवेक देविदास ठाकरे (जळगाव), अशोक शंकर पाटील (धुळे), आशिष युवराज पाटील (श्रीरामपूर), शंकर गोविंद सोमवंशी (नाशिक), संजय कांतिलाल गांधी (मनमाड), मंगेश मनोहर ढगे (सिन्नर), सुरेश टाके (नगर), पुरुषोत्तम कारभारी रकिबे (नाशिक), बाळासाहेब बाजीराव पवार (नगर) यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. 

2 लाख 56 हजारांवर मतदार 
एकूण मतदार ः 2 लाख 56 हजार 472 
नाशिक ः 96 हजार 136 
नगर ः 85 हजार 565 
जळगाव ः 34 हजार 442 
धुळे ः 25 हजार 422 
नंदुरबार ः 14 हजार 907 

Web Title: Nashik graduates 24 nominations