नाशिक: ग्रामिण भागातही १ फेब्रुवारीपासून हेल्मेटसक्ती

नाशिक: ग्रामिण भागातही १ फेब्रुवारीपासून हेल्मेटसक्ती

वणी (नाशिक) : शहरात राबविण्यात येणारी हेल्मेट सक्ती मोहीम आता जिल्ह्यातील ग्रामीण भागातही एक फेब्रूवारीपासून राबविण्यात येणार असून, त्यादृष्टीने ग्रामिण भागातील पोलिस ठाण्याच्यावतीने नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे.

नाशिक ग्रामिण पोलिस अधिक्षक संजय दराडे यांनी १४ जानेवारी घेतलेल्या गुन्हे परिषद बैठकीत घेतली. जिल्ह्यातील ग्रामिण भागातील सर्वच पोलिस ठाण्याच्या हद्दीत मोटर अपघातात गुन्ह्यतील मोटर सायकलस्वारांचा हेल्मेट परिधान न केल्यामूळे मृत्यु झाला. याबाबत पोलिस अधिक्षक संजय दराडे यांनी १ फेब्रुवारी ते १५ फेब्रुवारी या कालावधीत जिल्ह्यातील मालेगांव सह सर्व पोलिस ठाण्याच्या हद्दीत हेल्मेट सक्ती करण्यात आली. त्यादृष्टीने विशेष मोहिम राबवून हेल्मेट परिधान न केलेल्या दुचाकीस्वार यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. याबाबत सर्वच पोलिस ठाण्याच्यावतीने नागरिकांमध्ये हेल्मेट वापरण्याविषयी जनजागृती करण्यात येत आहे. यासाठी गावागावांत जनजागृती बाबतचे होल्डींग लावण्यात येत असून पत्रकांचे वाटप करण्यात येत आहे. तसेच महाविद्यालय, कार्यालय, सार्वजनिक ठिकाणी पोलिसांच्यावतीने जनजागृती करण्यात येत आहे. दरम्यान ग्रामिण भागात हेल्मेट सक्तीची केली असली तरी ग्रामिण भागात हेल्मेट विक्रीची दुकाने क्वचितच आहे. तसेच जवळपास ७० टक्के दुचाकीधारकांकडे हेल्मेट नसल्याने हेल्मेट सक्ती कुठ पर्यंत यशस्वी ठरते याबाबत नागरिकांत साशंकता व्यक्त केली जात आहे. 

नाशिक जिल्ह्यात १ फेब्रुवारी पासून दुचाकीस्वारांना हेल्मेट सक्ती करण्यात आली आहे. याबाबत पोलिस स्टेशनच्या हद्दीत जनजागृती करण्यात येत आहे. वणी पोलिस ठाण्याच्या हद्दीत वर्षभरात ३३ दुचाकीस्वारांना अपघातात प्राण गमवावा लागला आहे. त्यात बहुतांशी दुचाकीस्वार डोक्याला मार लागल्याने मयत झाले आहे. दुचाकीस्वारांनी स्वत:च्या जीवीताचे सरंक्षणासाठी हेल्मेट वापरणे काळाची गरज आहे.
 - प्रविण पाडवी, सहाय्यक पोलिस निरीक्षक, वणी पोलिस ठाणे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com