‘बीएएमएस’साठी १८० जागांची भर

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 3 जुलै 2018

नाशिक - वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशाची प्रक्रिया सध्या सुरू आहे. याअंतर्गत विविध आयुर्वेद महाविद्यालयात बीएएमएस अभ्यासक्रमाच्या उपलब्ध जागांमध्ये आणखी १८० जागांची भर पडली आहे. तसेच, होमिओपॅथीच्या ९० अतिरिक्‍त जागांवर प्रवेश दिले जाणार आहेत. 

सद्य:स्थितीत कार्यरत असलेल्या नऊ आयुर्वेद महाविद्यालयांची विद्यार्थी क्षमता वाढविल्याचे राज्य सामूहिक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत स्पष्ट करण्यात आले आहे.  

यापूर्वीच्या प्रवेश क्षमतेचा अंदाज घेऊन विद्यार्थ्यांनी पसंतीक्रम नोंदविले होते. नंतर वाढीव जागांची घोषणा झाल्याने काही विद्यार्थ्यांचा अंदाज चुकण्याची शक्‍यता आहे. दरम्यान, फिजिओथेरपी अभ्यासक्रमाकरिता तीन महाविद्यालयांत प्रत्येकी दहा जागा वाढविण्यात आल्या आहेत.

Web Title: nashik news 180 seats for BAMS