राज्य उत्पादन शुल्ककडून पावणेचार लाखांची दारू जप्त

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 3 ऑक्टोबर 2017

नाशिक - महात्मा गांधी जयंती म्हणजे "ड्राय डे'. आज या दारू विक्रीस प्रतिबंध असलेल्या दिवशी शहरात दमण येथून फोर्ड फिस्टातून होणारी तीन लाख 85 हजारांच्या अवैध दारू वाहतुकीचा पदार्फाश केला. याप्रकरणी राज्य उत्पादन शुल्क विभागाने एकाला अटक केली.

राज्यात विक्रीला प्रतिबंध असलेली दमणनिर्मित आणि दादरा-नगरहवेली येथे विक्रीस असलेली दारू नाशिकला येणार असल्याची माहिती मिळाल्यावरून उत्पादन शुल्क विभागाचे उपायुक्त प्रसाद सुर्वे, निरीक्षक एम. बी. चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आडगाव शिवारातील नटखट हॉटेल परिसरात सापळा रचून ही कारवाई झाली. पथकाला महामार्गावर वाहन तपासणीदरम्यान कारसह मद्यसाठा हाती लागला. संशयास्पद आलेल्या फोर्ड फिस्टा (एमएच 12- एचएल 4918) कारमधून ही दारू वाहतूक होत असल्याचे उघडकीस आले. रवींद्र दिलीपराव पगार असे कारमधून अवैध मद्य वाहतूक करणाऱ्या संशयिताचे नाव आहे.

Web Title: nashik news 3.75 lakh rupees wine seized