नाशिकमध्ये बसविणार वायू प्रदूषण नियंत्रण यंत्रे

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 27 डिसेंबर 2017

नाशिक - प्रदूषित शहरांमध्ये नाशिकचा समावेश करण्यात आल्याने स्वच्छ व हवेशीर नाशिकचा लौकिक खराब होऊ नये, यासाठी एका खासगी संस्थेच्या माध्यमातून शहरात आठ ठिकाणी वायू प्रदूषण नियंत्रक यंत्रे बसविली जाणार आहेत. अर्थात त्यासाठी महासभेवर प्रस्ताव दाखल झाला आहे. पालिकेला फक्त वीजपुरवठा करण्याचा खर्च करावा लागणार आहे.

नाशिक शहरात दररोज धावणाऱ्या वाहनांची संख्या साडेतीन लाखांच्या वर गेली आहे. दरवर्षी वाहनांच्या संख्येत सातत्याने भर पडत असल्याने वायू प्रदूषणाची समस्या भेडसावू लागली आहे. त्यामुळे मुंबई, पुणे पाठोपाठ नाशिक शहरही प्रदूषणाबाबत वरच्या स्थानावर आले आहे. शहर प्रदूषणमुक्त राहण्यासाठी दक्ष नागरिक संघाने वायू प्रदूषण मापक यंत्रे बसविण्याची तयारी दाखविली आहे.

Web Title: nashik news Air Pollution Control Machines to be installed in Nashik