स्वच्छतेसाठी ‘आरोग्य’कडून बक्षीस योजना जाहीर

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 23 जून 2017

सहा विभागांत जून ते ऑगस्टदरम्यान नियोजन; कचरा विलगीकरण घरांमधूनच

नाशिक - स्वच्छ भारत अभियानात क्रमांक घसरलेल्या नाशिक महापालिकेने पुढील वर्षाच्या सर्वेक्षणात वरच्या स्थानावर पोचण्यासाठी कंबर कसली आहे. त्याचाच एक भाग म्हणून घंटागाडीद्वारे संकलित केला जाणारा कचरा घरांमधूनच विलगीकरण करून घेतला जाणार आहे. याबाबत जनजागृती करणे, तसेच प्रभाग शंभर टक्के स्वच्छ करण्याचा भाग म्हणून बक्षीस योजना जाहीर करण्यात आली. सहा विभागांमधून जून ते ऑगस्टदरम्यान पाच हजार रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले.

विभागीय अधिकारी व विभागीय स्वच्छता निरीक्षकांना बक्षिस दिले जाईल.
ऑगस्टअखेरपर्यंत ओला व सुका कचऱ्याचे विलगीकरण करून घंटागाड्यांमध्ये संकलित केले जाणार आहे. त्यापूर्वी घंटागाड्यांमध्ये कचरा विलगीकरणाची व्यवस्था करण्यासाठी ठेकेदारांना सूचना देण्यात आल्या आहेत. ऑगस्टनंतर घरातूनच ओला व सुका कचरा संकलित केला जाईल.

त्यासाठी आरोग्य विभागातर्फे जून, जुलै व ऑगस्ट असे तीन टप्प्यांत नियोजन केले आहे. ऑगस्टनंतर कचरा विलगीकरण न करणाऱ्या नागरिकांवर एक ते पाच हजार रुपयांपर्यंत दंडात्मक कारवाई केली जाईल. त्यापूर्वी महापालिकेने सर्व तयारी केली असून, विभागीय अधिकारी व विभागीय स्वच्छता निरीक्षकांतर्फे स्वच्छतेविषयक जनजागृती व कचरा विलगीकरणाची प्रक्रिया पूर्ण करण्याचे नियोजन असल्याचे आरोग्य अधिकारी डॉ. सुनील बुकाणे यांनी सांगितले.
 
प्रभागनिहाय नियोजन असे -
जूनमध्ये सातपूर विभागातील प्रभाग नऊ, पूर्व विभागातील प्रभाग १५, पश्‍चिम विभागातील सात, सिडकोतील २४, पंचवटी विभागातील १७ व १८ असे आठ प्रभाग शंभर टक्के स्वच्छ, हागणदारीमुक्त व कचरा विलगीकरणासाठी निवडण्यात आले. जुलैमध्ये सातपूर विभागातील प्रभाग आठ व दहा, पूर्वमधील १६ व २३, पश्‍चिम विभागातील प्रभाग १२, सिडको विभागातील २५ व २७, पंचवटी विभागातील तीन व सहा, नाशिक रोड विभागातील १९ व २० असे अकरा प्रभाग निवडले आहेत. ऑगस्टमध्ये सातपूर विभागातील प्रभाग ११ व २६, पूर्व विभागातील ३० व १४, पश्‍चिम विभागातील तेरा, सिडकोतील २८, २९, ३१, पंचवटी विभागातील चार व पाच, नाशिक रोड विभागातील २९ व २२ अशा १२ प्रभागांमध्ये स्वच्छता शंभर टक्के करण्याचे नियोजन आहे.

Web Title: nashik news Announcement of 'Health' prize scheme for cleanliness