रिक्षाचालकाचा गळा कापण्याचा प्रयत्न  

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 8 जून 2017

पंचवटी -  काळाराम मंदिर परिसरातील रिक्षाचालकावर टोळक्‍याने प्राणघातक हल्ला करून त्याचा गळा कापून त्याला ठार करण्याचा प्रयत्न केला. घटनेनंतर दोन दिवस उलटूनही पोलिस ठाण्याला लागून असलेल्या खासगी हॉस्पिटलमध्ये जाऊन जखमीचा जबाब घ्यायला पोलिसांना वेळ मिळाला नाही. हे गंभीर प्रकरण मिटविण्यासाठी पोलिस दबाव टाकत असल्याचा आरोप जखमी रिक्षाचालकाच्या नातेवाइकांनी केला.२़काळाराम मंदिर पूर्व दरवाजाजवळील भोलादास चाळीतील जितेंद्र सोमनाथ गुरव (वय २६) सोमवारी (ता.

पंचवटी -  काळाराम मंदिर परिसरातील रिक्षाचालकावर टोळक्‍याने प्राणघातक हल्ला करून त्याचा गळा कापून त्याला ठार करण्याचा प्रयत्न केला. घटनेनंतर दोन दिवस उलटूनही पोलिस ठाण्याला लागून असलेल्या खासगी हॉस्पिटलमध्ये जाऊन जखमीचा जबाब घ्यायला पोलिसांना वेळ मिळाला नाही. हे गंभीर प्रकरण मिटविण्यासाठी पोलिस दबाव टाकत असल्याचा आरोप जखमी रिक्षाचालकाच्या नातेवाइकांनी केला.२़काळाराम मंदिर पूर्व दरवाजाजवळील भोलादास चाळीतील जितेंद्र सोमनाथ गुरव (वय २६) सोमवारी (ता. ५) रात्री अकराच्या सुमारास घराजवळ बसला असताना संशयित प्रवीण पाटील, राघव वाघ आणि त्यांच्या एका साथीदाराने बहिणीची छेड काढण्याच्या वादातून तसेच मागील भांडणाची कुरापत काढून जितेंद्रला कोयता, गज आणि लाकडी दांडक्‍याने जबर मारहाण केली, असे त्याच्या नातेवाइकांनी सांगितले.

संशयितांनी जितेंद्रच्या गळ्यावर कोयता मारल्याने मोठा रक्तस्त्राव झाला. त्याचा भाऊ नितीन याने जखमी जितेंद्रला पंचवटी पोलिस ठाण्याशेजारी असलेल्या खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. जितेंद्रच्या हाताला फ्रॅक्‍चर झाले आहे. याबाबत रुग्णालयाने सोमवारी रात्री पावणेबाराला पंचवटी पोलिसांना माहिती दिली. ठार करण्याच्या प्रयत्नासारखे गंभीर प्रकरण घडूनही संशयितांना पोलिस ठाण्यात आणून सोडून दिल्याचे समजते. गुन्हा घडून दोन दिवस उलटूनही जखमी जितेंद्र याचा जबाब घ्यायला कोणीच येत नसून, हा गुन्हा लपविला जात असल्याचा आरोप त्याच्या नातेवाइकांनी केला.

Web Title: nashik news autorickshaw driver murder