देशात शांतता नांदण्यासाठी दुआ 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 3 सप्टेंबर 2017

जुने नाशिक - "एक सप में खडे हो गये, मेहमूद ओ अयाज न कोई बंदा रहा ना कोई बंदा नवाज' अर्थात अल्लासाठी कुणी लहान नाही, कुणी मोठे नाही, श्रीमंत नाही, गरीब नाही. धार्मिक कार्यक्रम असो वा सामाजिक, एकत्र आलेले सर्व माझ्यासाठी सारखेच आहेत, असा संदेश देत बकरी ईद उत्साहात साजरी झाली. शहॉंजानी ईदगाह मैदान (गोल्फ क्‍लब) येथे ईदची मुख्य नमाज झाली. या वेळी सामाजिक एकतेचा संदेश देत देशात शांतता नांदण्यासाठी दुआ मागितली. 

बकरी ईदची मुख्य नमाज सकाळी दहाच्या सुमारास शहर-ए-खतीब हिसामोद्दीन यांच्या नेतृत्वात झाली. तत्पूर्वी मौलाना मेहबूब आलम यांनी मुस्लिम बांधवांना बकरी ईदबाबतचे धार्मिक प्रवचन केले. मीरमुक्तार अशरफी यांनी तीन तलाकसह सामाजिक-धार्मिक बाबींची माहिती दिली. यानंतर शहर-ए-खतीब यांनी ईदच्या नमाजाची पद्धत समजून सांगितली. त्यानंतर दोन रकात नमाज झाली. खुदबा पठण तसेच सलाम पठण करून नमाजाचा समारोप झाला. शहर-ए-खतीब यांच्यातर्फे सर्वांना ईदच्या शुभेच्छा देण्यात आल्या. यानंतर महापौर रंजना भानसी, पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल, उपमहापौर प्रथमेश गिते, स्थायी समिती सभापती शिवाजी गांगुर्डे, पोलिस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील, सहाय्यक पोलिस आयुक्त राजू भुजबळ आदींनी हिसामोद्दीन खतीब यांची भेट घेऊन शुभेच्छा दिल्या. चिमुकल्यांनी एकमेकांना गुलाबाचे फूल देत, तर मोठ्यांनी गळाभेट घेत, सोशल मीडियाच्या माध्यमातून ईद शुभेच्छा दिल्या. 

"तलाक देना हराम' 
ईदच्या नमाजासाठी जमलेल्या मुस्लिम बांधवांसह अन्य समाजबांधवांमध्ये तीन तलाकबाबतचे असलेले संम्रभ दूर करण्यासाठी मीर मुक्तार अशरफी यांनी नमाजदरम्यान तीन तलाकचा विरोध केला. इस्लाममध्ये "तलाक देना हराम है, तलाक से बचे' अशा शब्दांत तलाकची निंदा केली. इस्लाममध्ये नेहमी महिलांचा आदर करण्याचे शिकविले, त्याच तत्त्वावर मुस्लिम चालत असल्याने महिला समाजात स्वतः सुरक्षित समजतात. परंतु काही जणांनी तीन तलाकचा अर्थ बदलून टाकला आहे. त्यामुळेच आज अशा प्रकारचा प्रसंग मुस्लिम बांधवांवर ओढावला आहे. 

पूरग्रस्तांसाठी मदत 
हजरत सय्यद सादीक शहा हुसैनी रिलीफ कमिटीकडून बडी दर्गा येथे दर्शनासाठी आलेल्या मुस्लिम बांधवांकडून उत्तर प्रदेश पूरग्रस्तांसाठी मदत जमा करण्यात आली. जमलेली रक्कम पूरग्रस्तांच्या मदतीसाठी तेथील शासकीय बॅंक खात्यात जमा केली जाणार आहे. त्याचप्रमाणे ब्रह्मा येथे मुस्लिम बांधवांवर होणारे अत्याचार तसेच काश्‍मीरसह देशाच्या विविध भागांत होणाऱ्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध करण्यात आला. 

Web Title: nashik news Bakra Eid