बसपोर्टच्या मुद्द्यावरून भाजप-शिवसेना आमनेसामने

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 5 जुलै 2017

नाशिक - येथील मेळा बसस्थानकाच्या जागी राज्यातील पहिले वातानुकूलित बसपोर्ट साकारले जाणार आहे. यासंदर्भात आमदार प्रा. देवयानी फरांदे यांनी पत्रकार परिषद घेऊन काल (ता. ३) माहिती दिली. मात्र, खासदार हेमंत गोडसे यांनी केलेल्या शिफारशीनुसार दहा कोटी ९९ लाख १४ हजार ७९५ रुपयांच्या रकमेस प्रशासकीय मंजुरी दिली असल्याचे प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे. बसपोर्टच्या मुद्द्यावरून सत्ताधारी भारतीय जनता पक्ष व शिवसेनेत यानिमित्त श्रेयवादाची लढाई सुरू झाली असून, सत्ताधाऱ्यांमधील विसंवादही चव्हाट्यावर आला आहे.

सुमारे साडेबारा कोटी रुपये खर्चून साकारण्यात येणाऱ्या या बसपोर्टमध्ये २० फलाट असणार आहेत. तसेच, विविध अत्याधुनिक सुविधाही असतील. यासंदर्भात आमदार फरांदे यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. परिवहनमंत्री दिवाकर रावते यांचे पत्रकार परिषदेत आभार मानले. मात्र, लोकसभा मतदारसंघाचे खासदार गोडसे यांचा साधा उल्लेखही पत्रकार परिषदेत केला नाही. दरम्यान, आज यासंदर्भात श्री. गोडसे यांनी प्रसारमाध्यमांना प्रसििद्धपत्रक पाठविले. परिवहनमंत्री रावतेंच्या स्वाक्षरीचे पत्रही जोडले आहे.

कामाचे भूमिपूजन करणार कोण?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नाशिक दौऱ्याच्या वेळी बसपोर्टच्या कामाचे भूमिपूजन केले जाईल, असे आमदार फरांदे यांनी सांगितले. मात्र, खासदार गोडसे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात या कामाला लवकरच सुरवात होणार असल्याचे नमूद केले आहे. त्यामुळे कामाचे भूमिपूजन कुणाच्या हस्ते होते, याकडे आता पक्षाच्या कार्यकर्त्यांसह सामान्यांचेही लक्ष लागून असेल.

Web Title: nashik news bjp shiv sena