नाशिकमध्ये ‘बीआरटीएस’ अशक्‍य

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 18 जुलै 2017

नाशिक - अहमदाबाद, पुणे शहराच्या धर्तीवर नाशिकमध्ये ‘बीआरटीएस’ प्रकल्प राबविण्याचे प्रयत्न सुरू असताना अर्बन मास ट्रान्स्पोर्ट कंपनीने नाशिकमध्ये ‘बीआरटीएस’ शक्‍य नसल्याचा निर्वाळा दिला. त्यामुळे सार्वजनिक वाहतुकीसाठी महापालिकेकडून इतर पर्याय तपासून पाहिले जाणार आहेत.

राज्य परिवहन महामंडळातर्फे शहरात सार्वजनिक वाहतुकीची सेवा दिली जाते. ती सेवा दिवसागणिक अपुरी पडत आहे. परिवहन महामंडळही सेवा पुरविण्याबाबत नकारात्मक भूमिकेत आहे. शहरात साडेनऊशेहून अधिक बसगाड्यांची आवश्‍यकता आहे. मात्र, अवघ्या सव्वादोनशे बसगाड्या चालविल्या जातात. त्यातील बहुतांशी बसगाड्या बंद असतात. प्रत्यक्षात पावणेदोनशे बसगाड्या रस्त्यावर धावतात. महापालिकेने परिवहन महामंडळाला सेवा सुरू ठेवण्यासाठी २००७ मध्ये ना हरकत दाखला दिला. त्यामुळे महापालिका बससेवा सुरू करणार नसल्याचे स्पष्ट झाले.

खासगीकरणातून सेवा सुरू करण्यासाठी काही वर्षांपूर्वी प्रयत्न सुरू होते; परंतु प्रयत्न फसले. शहरात बस रॅपिड ट्रान्सिस्ट सिस्टिम सुरू करण्याचा पर्याय ठेवला होता. नाशिक रोड ते शालिमार, त्र्यंबक नाका सिग्नल ते सातपूर, अशोक स्तंभ ते सोमेश्‍वर या तीन मार्गांवर सेवा देण्याचा प्रस्ताव समोर आला होता. पण नाशिककरांची मानसिकता नसल्याने ‘बीआरटीएस’चा प्रकल्प मागे पडला. काही दिवसांपूर्वी पुन्हा ‘बीआरटीएस’ सेवा देण्याचा विचार समोर आला; परंतु शहराच्या सर्वंकष वाहतुकीचे सर्वेक्षण करणाऱ्या दिल्लीस्थित संस्थेने ‘बीआरटीएस’ला कमी गुण दिल्याने हा पर्याय मागे पडणार आहे.

Web Title: nashik news brts project unsuccess in nashik