शेतकरी आत्महत्येबाबत सरकारवर गुन्हा दाखल करा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 ऑक्टोबर 2017

नाशिक  - शेतकऱ्यांच्या आत्महत्यांना जबाबदार असलेल्या राज्य सरकारवर खुनाचा गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी नाशिक जिल्हा शेतकरी संघटनांच्या सुकाणू समितीने मोर्चा काढला. राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीची घोषणा केली. मात्र, प्रत्यक्षात शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी दिली नाही. जाचक अटींमुळे शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ मिळत नाही. राज्यभरातील एक कोटी चार लाख शेतकऱ्यांपैकी 58 लाख शेतकरी कर्जमाफीचे अर्ज भरू शकलेले नाहीत. कर्जमाफीच्या घोषणेनंतरही शेतकरी आत्महत्या सुरू आहेत. शेतकऱ्यांना आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या धोरणामुळे राज्य सरकरावर खुनाचे गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.
Web Title: nashik news case on government against the farmers for suicides