चिनी वस्तू वापरावर नागरिकांकडून बंदी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 13 ऑगस्ट 2017

गणेशोत्सव वस्तूंच्या मागणीत पंधरा टक्‍क्‍यांनी घट - सजावटीसाठी दाखल साहित्य ‘जैसे थे’

नाशिक/जुने नाशिक - चीनच्या सूडबुद्धीला आव्हान देण्याच्या निमित्ताने बऱ्याच नागरिकांकडून चिनी वस्तूंच्या वापरावर बंदी आणली आहे. त्यानिमित्ताने गणेशत्सोवासाठी बाजारात विक्रीस आलेल्या चिनी वस्तूंच्या मागणीत सुमारे पंधरा टक्‍क्‍यांनी मागणी घटल्याची माहिती विक्रेत्यांनी दिली.

गणेशोत्सव वस्तूंच्या मागणीत पंधरा टक्‍क्‍यांनी घट - सजावटीसाठी दाखल साहित्य ‘जैसे थे’

नाशिक/जुने नाशिक - चीनच्या सूडबुद्धीला आव्हान देण्याच्या निमित्ताने बऱ्याच नागरिकांकडून चिनी वस्तूंच्या वापरावर बंदी आणली आहे. त्यानिमित्ताने गणेशत्सोवासाठी बाजारात विक्रीस आलेल्या चिनी वस्तूंच्या मागणीत सुमारे पंधरा टक्‍क्‍यांनी मागणी घटल्याची माहिती विक्रेत्यांनी दिली.

गणेशोत्सव म्हटलं, की नागरिकांकडून आकर्षक आरास, देखावा तयार करण्यावर भर दिला जातो. त्यासाठी विशेषतः चिनी वस्तूंचा अधिक वापर करण्यात येतो. या वेळी सजावटीसाठी लागणारे कमल फूल, झाड, मेटल बल्ब, लहान-मोठी लायटिंग, स्पॉट लाइट, एलईडी स्ट्रीप, लेझर लाइट, नारळ, एलईडी पार लाइट, ड्रॉप लाइट अशा विविध प्रकारच्या वस्तू बाजारात दाखल झाल्या आहेत. काही दिवसांपासून चीनकडून देण्यात येत असलेल्या धमक्‍यांमुळे देशवासीयांनी चिनी वस्तूंच्या वापरावर बहिष्कार टाकण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचा चिनी वस्तूंच्या विक्री व वापरावर परिणाम झाला आहे.

खरेदीमुळे मेन रोड गजबजला
तेरा दिवसांवर गणेशाचे आगमन येऊन ठेपले असल्याने गणेशाच्या जंगी स्वागताची तयारी सध्या घरोघरी, मंडळामध्ये सुरू आहे. साहित्य खरेदी करण्यासाठी काल मेन रोड परिसर गर्दीने फुलून गेला होता. गणेशमूर्तीपासून ते शाडूमाती कार्यशाळेपर्यंत इकोफ्रेंडली गणेशोत्सव साजरा करण्यासाठी विविध स्पर्धा, कार्यशाळा शहरात घेतल्या जात आहेत. त्यात गणेशाच्या आराशीसाठी इलेक्‍ट्रॉकनिक्‍स वस्तूंचा उपयोग केला जातो. त्याच पार्श्‍वभूमीवर बाजारात लायटिंगच्या माळा, बल्बचे प्रकार बाजारात दाखल झाले आहेत.

आकर्षक रोषणाई अन्‌ सजावट
गणेशाची स्थापना घरी असो वा सार्वजनिक मंडळात त्यात लायटिंगचा हमखास उपयोग असतो. लाइटच्या विविध रंगांनी गणेशाच्या आराशीला एक प्रकारची रंगत येते. अनेक वस्तू सजावटीमध्ये भर घालतात. त्यामुळे त्याला अधिक मागणी असल्याचे विक्रेत सांगतात. आजचा शनिवार आणि लागोपाठ चार सुट्या आल्याने चिमुकल्यांपासून ते मोठ्यापर्यंत गणेशाच्या आराशीसाठी लागणारे लाइट खरेदी करायला दुकांनामध्ये चांगलीच गर्दी केली. त्याचबरोबर भारत-चीन संबंधाची परिस्थिती पाहता विक्रेत्यांनी चिनी वस्तू दुकांनामधून वर्ज्य केल्या आहेत. आता चिनी वस्तूंचा केवळ जुनाच स्टॉक शिल्लक पाहायला मिळतो. भारतीय बनावटीची लायटिंग माळ ५५ रुपयांपासून १५० रुपयांपर्यंत उपलब्ध आहे.

सर्वाधिक मागणी लायटिंगच्या माळांना आहे. घरी गणेशाच्या आराशीसाठी सजवण्यासाठी लागणाऱ्या छोट्या लायटिंगच्या माळांमध्ये २२ प्रकार आहेत. त्यामध्ये बल्बच्या आकरात फरक आहे. माळेला रिमोट असल्याने पाहिजे तसे लाइट ठेवता येतात. 
- कैलाश तलरेजा, शिवम नॉव्हेल्टी

गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी चिनी वस्तूंच्या खेरदी-विक्रीत घट झाली असली, तरी वेळेवर मागणी वाढण्याची शक्‍यता आहे.
- विराज काठे, विक्रेता 

Web Title: nashik news Censorship of Chinese goods ban