चारही आरोपी आज विशेष मोका न्यायालयात 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 4 जानेवारी 2018

नाशिक - चांदवड शस्त्रसाठा प्रकरणामध्ये अटक करण्यात आलेल्या चौघांविरोधात "मोका'अन्वये सात दिवसांच्या पोलिस कोठडीची मुदत गुरुवारी (ता.4) संपत आहे. त्यामुळे चारही संशयितांना उद्या नाशिकच्या विशेष "मोका' न्यायालयात हजर केले जाणार आहे. संशयितांचा ताबा घेण्यासाठी मुंबई गुन्हे शाखेसह उत्तर प्रदेशातील बांदा पोलिसही उद्या न्यायालयात येणार आहे. 

चांदवड शस्त्रसाठा प्रकरणातील संशयित बद्रिनुजमान अकबर बादशहा उर्फ सुमित उर्फ सुका पाशा (29), नागेश बनसोडे (21, रा. वडाळा), अमीर रफिक शेख, वाजिद अली फैयाज अली (28, रा. शिवडी, मुंबई) यांच्या "मोका'अंतर्गत पोलिस कोठडीची मुदत उद्या संपत आहे. गेल्या 14 डिसेंबर रोजी संशयितांना चांदवडच्या टोल नाक्‍यावर शस्त्रसाठ्यासह अटक करण्यात आली होती; तर गेल्या 28 डिसेंबर रोजी त्यांच्यावर "मोका'अन्वये कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, गेल्या वेळी संशयितांचा ताबा घेण्यासाठी आलेल्या मुंबई गुन्हे शाखेच्या पथकला माघारी फिरावे लागले होते. त्यामुळे संशयितांचा पुन्हा ताबा घेण्यासाठी ते उद्या न्यायालयाकडे अर्ज करण्याची शक्‍यता आहे; तसेच बांदा (उत्तर प्रदेश) येथील "न्यू पंजाब मेसर्स' या शस्त्रविक्री दुकानावर दरोडा टाकल्याप्रकरणी बांदा पोलिस संशयितांचा ताबा घेण्यासाठी येण्याची शक्‍यता आहे. 

Web Title: nashik news Chandwad Weapon Case crime