'समृद्धी'बाधितांकडून मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे

'समृद्धी'बाधितांकडून मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे

नाशिक - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना काळे झेंडे दाखविण्यापासून समृद्धी महामार्गबाधितांना रोखण्यासाठी कडेकोट बंदोबस्त तैनात करूनही मुंबई-आग्रा महामार्गावरील जत्रा हॉटेलजवळ आंदोलकांनी घोषणाबाजी करत मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवले.

शिवडे येथील "समृद्धी'बाधितांनी गेल्या वर्षापासून जमिनी वाचविण्यासाठी आंदोलन सुरू केले आहे. गेल्या हिवाळी अधिवेशनात प्रकल्पाला विरोध करणाऱ्यांचा "दलाल' असा उल्लेख मुख्यमंत्र्यांनी केल्याने आजच्या आंदोलनाची धार वाढली होती. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नाशिक दौऱ्यात काळे झेंडे दाखवून त्यांचा निषेध करणार असल्याचे "समृद्धी'बाधितांनी जाहीर केले होते. त्यामुळे आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या राजू देसले यांना पोलिसांनी सकाळीच स्थानबद्ध केले होते. मात्र, आंदोलकानी गनिमी काव्याने आंदोलन यशस्वी केले. मुख्यमंत्री ओझर मार्गे त्र्यंबकेश्‍वरला जाणार असल्याने त्यांनी जत्रा हॉटेल कोनार्क नगर परिसरात एकत्र येत मुख्यमंत्र्यांच्या वाहनाचा ताफा येताच काळे झेंडे दाखवून निदर्शने केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com