बळी गेल्यानंतरच सरकारला जाग -  चित्रा वाघ

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 13 सप्टेंबर 2017

नाशिक - राज्यातील जिल्हा रुग्णालयांमध्ये पुरेशा सोयीसुविधा नाहीत. इन्क्‍युबेटरची संख्या वाढविण्यात आलेली नसून त्यासंदर्भातील पाठपुरावा प्रशासनाकडून केला गेला. मात्र मुख्यमंत्र्यांनी ज्या शहराला दत्तक घेतले आहे, त्याच नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात एकाच महिन्यात 55 नवजात बालके दगावली. नवजात बालकांचे बळी गेल्यानंतर सरकारला जाग आली हेच खरे आहे. राज्यातील युती सरकार हे असंवेदनशील असल्याची टीका राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी मंगळवारी केली. 

नाशिकच्या शासकीय जिल्हा रुग्णालयात नवजात बालमृत्युसंदर्भात आज राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, आमदार दीपिका चव्हाण आदींनी जिल्हा रुग्णालयास भेट देऊन पाहणी केली. यावेळी चित्रा वाघ यांनी जिल्हा रुग्णालयाचे अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. जी. एम. होले, "एसएनसीयू' कक्षाचे प्रमुख डॉ. पंकज गाजरे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर बालकांची पाहणी केली. 

साहेब बाहेर असते तर... 
राज्य सरकार आणि प्रशासकीय यंत्रणा यांच्यात कोणताही समन्वय नाही. त्याचाच प्रत्यय बालमृत्यू प्रकरणातून पुन्हा आला आहे. प्रशासनाने पाठपुरावा करून झोपलेल्या सरकारने उपाययोजना केल्या नाहीत. 55 बालके दगावल्यानंतर सरकार "सी पॅप' आणि इन्क्‍युबेटर वाढविण्याचे आदेश देत आहे. यापूर्वीच हे झाले असते तर किमान बालकांचा जीव वाचला असता. आज भुजबळ साहेब बाहेर असते, तर याच युती सरकारला त्यांनी या प्रश्‍नावरून सळो की पळो करून सोडले असते, असे चित्रा वाघ यांनी राष्ट्रवादी भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. 

आघाडी सरकारच्या काळातील गर्भवती महिलांसाठीच्या योजना सरकारने बंद पाडल्या आहेत. त्यामुळे ग्रामीण व आदिवासी भागातील कुपोषित गर्भवतींचे प्रमाण वाढले आहे. कुपोषित नवजात बालकांचा प्रश्‍न गंभीर झाला आहे. आरोग्यासंदर्भात शासन पूर्णत: उदासीन असून याचा सरकारला आगामी हिवाळी अधिवेशनात जाब विचारला जाईल. 
- चित्रा वाघ, प्रदेशाध्यक्षा, राष्ट्रवादी महिला कॉंग्रेस 

Web Title: nashik news Chitra wagh state government